बारामतीत पाट्या, ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल’

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजयी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपाच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. तसंच त्यांच्यासमोरील सर्वच उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ त्यांच्या अभिनंदनाचं बॅनर्स लावण्यात आले. त्यावरील आगळावेगळा मजकूर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजयी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या भाजपाच्या गोपीनाथ पडळकरांसह सर्वच उमेदवारांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. तसंच त्यांच्यासमोरील सर्वच उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यानंतर अजित पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानाजवळ त्यांच्या अभिनंदनाचं बॅनर्स लावण्यात आले. त्यावरील आगळावेगळा मजकूर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करुन मिळेल’ असा मजकूर या बॅनर्सवर छापण्यात आला आहे. नुकतेच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समोरील उमेदवाराला तब्बस १ लाख ६५ हजारांपेक्षा अधिक मतांनी धुळ चारली. त्यानंतर त्यावरून आता पोस्टरबाजीला उधाण आलं आहे. ‘आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल,’ अशा आशयाचे पोस्टर्स बारामतीमध्ये लावण्यात आले आहेत.

निवडणुकांपूर्वीच अजित पवार यांनी तडकाफडकी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. तसंच ते काही वेळासाठी अचानक सर्वांच्या संपर्काबाहेर गेले होते. त्यानंतर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत आपण बारामतीत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवल्याचं म्हटलं होतं. तसंच निकालानंतरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. निकालानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु त्यावेळीही अजित पवार उपस्थित नव्हते. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीदरम्यानही अजित पवार अनुपस्थित होते.

Web Title: Ncp Leader Ajit Pawar Won By More Than 1 65 Lakh Votes Banner Out Side House On Deposit Maharashtra Vidhan Sabha Election 2019 


संबंधित बातम्या

Saam TV Live