राष्ट्रवादी काँग्रेसचं 'मिशन विदर्भ', भाजप, काँग्रेसवर मात करण्याचा प्रयत्न

साम टीव्ही
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021
  • राष्ट्रवादी काँग्रेसचं 'मिशन विदर्भ'
  • विदर्भात ताकद वाढवण्याची रणनीती
  • भाजप, काँग्रेसवर मात करण्याचा प्रयत्न

काँग्रेस आणि भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही विदर्भाकडे मोर्चा वळवलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाढलेले विदर्भ दौरे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'मिशन विदर्भची' चर्चा रंगलीय.

पश्चिम महाराष्ट्रात मजबूत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता विदर्भाकडे मोर्चा वळविलाय. विदर्भात संधी असल्यानं राष्ट्रवादीने विदर्भात संघटना मजबूत करायला सुरुवात केलीय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या परिवार संवाद यात्रेची विदर्भातून सुरुवात केलीय. शिवाय सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भ दौऱ्यावर आहेत. 

एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भावर गेल्या दोन निवडणुकांपासून भाजपने चांगलीच पकड बसवली होती. फडणवीस सरकारच्या काळात भाजपचे सर्वाधिक आमदार विदर्भातून निवडून आले होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसलाय. तर काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालंय. त्यामुळे विदर्भात पुन्हा पाय रोवण्याची रणनीती काँग्रेसने आखलीय. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून काँग्रेसनं विदर्भातील नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष बनविलंय. 

एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसने संघटना बळकट करण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरु केलेत. मात्र, विदर्भवादी जनता राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारेल का, हे पाहणं महत्वाचं ठरेल,


संबंधित बातम्या

Saam TV Live