'त्या' तरुणांना आमदार शशिकांत शिंदेंची दमबाजी ..पहा व्हिडिओ

Shashikant Shinde giving Warning to Agitating youth in Satara
Shashikant Shinde giving Warning to Agitating youth in Satara

सातारा : मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation निकाला नंतर काल साताऱ्यात Satara त्याचे पडसाद पाहायला मिळाले. दोन युवकांनी गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमोर शेण्या जाळल्या तर राष्ट्रवादी  NCP आणि काँग्रेसच्या Congress कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर या तरुणांनी तोडफोड करतानाचे व्हीडीओ आणि प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्हायरल केल्या. या तरुणांना राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी त्यांच्या घरी जाऊन इशारा दिला. NCP MLA Shashikant Shinde giving Warning to agitating youth in Satara

सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court of India  मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द ठरवले. त्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. महाविकास आघाडीमुळेच हे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. न्यायालयाने राज्य सरकारने बनविलेला मराठा आरक्षण कायदाही सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. त्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई Shanbhuraj Desai यांच्या सातारा शहरातील 'कोयना दौलत' या निवासस्थाना बाहेर अज्ञात दोन व्यक्तींनी गोवऱ्या पेटवल्याची घटना काल घडली. तसेच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया वर सुद्धा दगडफेक झाली. काँग्रेसच्या कार्यालाचीही तोडफोड झाली होती. 

आरक्षणाच्या निकाला विरोधात हा झालेला उद्रेक होता. या गोष्टीची माहिती राष्ट्रवादी चे आमदार शशिकांत शिंदे यांना समजल्यावर त्यांनी युवकांच्या घरी जाऊन त्यांना इशारा दिला. या तरुणांना नीट समजून सांगा मी मनात आणलं तर मी काहीही करू शकतो. ही लास्ट वॉर्निंग आहे परत सांगायला येणार नाही, असा दम देखील भरला.

परंतु शशिकांत शिंदेंच्या या दमबाजीला तेवढ्याच प्रखरतेने उत्तर देत हल्लेखोर तरुणांनी सुद्धा शिंदे यांना आव्हान दिले आहे.मराठा समाजाची चेष्टा झाल्यामुळे हे आमचे प्रतिउत्तर आहे, हा तुम्ही ठराविक मावळ्यांचा उद्रेक बघत आहात अजून तुम्हाला सर्वांचा उद्रेक बघायचा आहे. मराठा समाजाची ज्यांनी चेष्टा केली आहे त्यांच्यासाठी हे एकच उत्तर आहे, असे या तरुणांनी शिंदे यांना सुनावले.NCP MLA Shashikant Shinde giving Warning to agitating youth in Satara

दरम्यान, २४ तासांच्या आत आरोपींना अटक करुन माहिती करुन घ्यावी. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही. राष्ट्रवादीची भूमीका मराठा समाजाच्या बाजूची आहे. राजकारण करुन कुणी याचे भांडवल करत असेल तर शासनाने त्याची दखल घ्यावी. जाणीवपूर्वक कुणी एका पक्षाला टार्गेट करत असेल तर त्यांना उत्तर देण्याची आमची ताकद आहे. यांचे कर्ते करविते कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असे आमदार शिंदे काल म्हणाले होते. 
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com