खासदार प्रफुल पटेल यांनी जाहीर केली लाॅकडाऊन बाबत भूमीका

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार (MP) प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध केला आहे. लोकांनी नियम (Rules) पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो, असे पटेल म्हणाले आहेत

गोंदिया: राज्यात करोनाची (Corona) दुसरी लाट गंभीर रूप धारण करत असून गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर  झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन (Lockdown) लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली आहे. असे असताना आता सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधून (NCP) लॉकडाऊनला विरोध (Protest) दर्शवण्यात आला आहे. MP Praful Patel announces NCPs stance on lockdown

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार (MP) प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा लॉकडाऊनला विरोध केला आहे, "आधीच जनता लॉकडाऊनला कंटाळली असताना लॉकडाऊन लावणे हा पर्याय नव्हे" असे  ते गोंदियात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.  "राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. त्यामुळेच अन्य इतर पर्यायांचा विचार व्हायला हवा", असे पटेल यांनी सांगितले. MP Praful Patel announces NCPs stance on lockdown

"लोकांनी नियम (Rules) पाळले तर लॉकडाऊन टाळता येऊ शकतो", असेही पटेलांनी नमूद करीत लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. यामुळे लॉकडाऊनला आतापासूनच विरोध केला जाऊ लागला असून हा विषय नव्या वादाला तोंड फोडणार असे दिसत आहे.

Edited by- Sanika Gade  


संबंधित बातम्या

Saam TV Live