इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

भूषण अहिरे
सोमवार, 17 मे 2021

केंद्र सरकार तर्फे इंधनाच्या  दरामध्ये झपाट्याने वाढ केली जाते आहे. केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी युवक कांग्रेस Congress पक्षातर्फे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे.

धुळे:  कोरोना Corona बरोबरच नागरिकांना महागाईचा Inflation देखील मार सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनामुळे नागरिकांचे हातचे काम गेले. त्यामुळे अक्षरशः उपासमारीची वेळ नागरिकांवर येऊन ठेपलेली आहे.NCP Youth Congress agitation in Dhule against fuel price hike

हे देखील पहा -

असे असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकार Central Government तर्फे इंधनाच्या Fuel दरामध्ये झपाट्याने वाढ केली जाते आहे. केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी NCP युवक कांग्रेस Congress पक्षातर्फे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन  Agitation करण्यात आले आहे. 

तर या सरकारवर मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल करू नये - प्रकाश आंबेडकर

केंद्र सरकारच्या या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचा चांगलाच फटका बसला आहे. याबाबत निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनी शहरातील पेट्रोल पंपावर महाग असलेले पेट्रोल आपल्या वाहनांमध्ये भरले आणि पेट्रोल Petrol भरून जाणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प तसेच खडीसाखर वाटून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध केला आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live