Breaking राष्ट्रवादीची पंढरपूरची उमेदवारी भगिरथ भालकेंना जाहीर...

भारत नागणे
सोमवार, 29 मार्च 2021

विधानसभा पोट निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भगिरथ भालके यांच्या नावाची आज घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे भारत भालके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. भाजपने (BJP) समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे

सोलापूर:  पंढरपूर (Pandharpur) विधानसभा पोट निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भगिरथ भालके यांच्या नावाची आज घोषणा केली आहे. NCPs candidature announced to Bhagirath Bhalke for Pandharpur

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या अकाली निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भालके कुटुंबाबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षकांसमोर भगीरथ भालके यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पंढरपूर दौऱ्यात राष्ट्रवादी उमेदवार हा तुमच्या मनातील असल्याचे सांगत ती भालके कुटुंबातच असणार असे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र, उमेदवारी भगिरथ भालके यांना मिळणार की जयश्री भालके यांच्या नावाची घोषणा होणार, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. अखेर भगिरथ भालके यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली.

भाजपने (BJP) समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर आज राष्ट्रवादीने  भालके यांना उमेदवारी दिली. दोन्ही उमेदवार उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच उद्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील हे दोन्ही नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. येत्या 17 एप्रिल रोजी हे मतदान (Election) होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणी (Counting of votes) होणार आहे. NCPs candidature announced to Bhagirath Bhalke for Pandharpur

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live