ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; तीन तालुक्यांचा संपर्क तुटला

प्रसाद नायगावकर/विनोद कोपरकर
गुरुवार, 10 जून 2021

गुंज येथील पुलाच्या अर्धवट कामाने पावसाळ्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता असलेली तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती.

यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) महागाव तालुक्यातील गुंज बस स्थानकावरील प्रगतीपथावर असलेल्या पुलाचे काम सबंधित ठेकेदाराने अर्धवट सोडून दिले. सकाळपासून संतधार कोसळणाऱ्या पावसाने महागाव ,पुसद,माहूर, या तीन तालुक्याचा संपर्क तुटला असून तब्बल चार तासापासून वाहतूक खोळंबली होती. अर्धवट पुलाच्या कामाने  पुलानजीक असलेल्या दुकान आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.(The negligence of the contractor Three talukas lost contact)

गुंज येथील पुलाच्या अर्धवट कामाने पावसाळ्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता असलेली तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. मात्र संबंधित प्रशासनाने तक्रार बेदखल करून ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप केला जात आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, यवतमाळमध्ये मागच्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली. पुसद तालुक्यात काल पावसाची तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली होती. ढगफुटीसारखा या तालुक्यात पाऊस झाला होता,  त्यामळे शेतकऱ्यांची मात्र पुरती दाणादाण उडाली होती. तालुक्यात पडलेल्या पावसाने पडला पारडी येथील नाल्याला मोठा पूर आला होता. त्यामुळे पारडी ते जांब बाजार रोड हा तब्बल एक तास बंद होता. तर पुसद दिग्रस रोड वरील वाहतुकीकरिता तात्पुरता बांधण्यात आलेला छोटा कच्चा पूल पाण्याने वाहून गेला होता.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live