भारताविरोधात बोलणारे नेपाळचे पंतप्रधान नरमले!

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जून 2021

सीमेवरील वादाबाबत भारताविरोधात आक्रमक विधाने करणारे नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली आता नरमले आहेत.

नवी दिल्ली : सीमेवरील वादाबाबत Boundary dispute भारताविरोधात India आक्रमक विधाने करणारे नेपाळचे Nepal पंतप्रधान केपी शर्मा ओली PM KP Sharma Oli  आता नरमले आहेत. ''एकेकाळी गैरसमज होते पण आता या गैरसमजांचे निराकरण केले आहे.  त्यामुळे आता आपण भूतकाळाच्या गैरसमजांना धरुन बसू नये. त्याऐवजी आपण भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे आणि आणि आपल्याला एक सकारात्मक संबंध निर्माण करावे लागतील, असे मत  पंतप्रधान ओली यांनी व्यक्त केले आहे. तथापि, ओली यांच्या या विधानानंतर नेपाळमध्ये राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Nepal PM Oli: ‘Misunderstandings’ with India resolved) 

चुकीच्या आकडेवारीमुळे अनलॉक मध्ये बुलढाण्याचा समावेश नाही !

स्थानिक मध्यमाशी  केपी शर्मा ओली यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि नेपाळमध्ये खूप जवळचे संबंध आहेत आणि दोन्ही देश  सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहेत. शेजारच्या देशांमध्ये प्रेम आणि कलह दोन्ही आहेत. चिली आणि अर्जेंटिनामधील लोकांना त्रास होत नाही का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.  त्याचबरोबर, त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील कोविड महामारीच्या कळत मदत करण्याचे आवाहन केले आहे.  'सध्याचा काळ आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता मी भारताच्या पंतप्रधानांना विनंती करू इच्छितो की, भारताने नेपाळला पूर्णपणे मदत करावी, अशी माझी इच्छा आहे. याचा अर्थ असा नाही की नेपाळला भारताकडून मदत मिळालेली नाही. यावेळी नेपाळला कोरोना लसींची आवश्यकता आहे. यासाठी नेपाळ आपल्या शेजारच्या देशाला आणि इतर सर्व देशांना विनंती करत आहे.'' 

- मदतीबद्दल भारत आणि चीन या दोघांचे आभार
त्याचबरोबर ओली यांनी कोविड लसी पुरवल्याबाबत चीन आणि भारताचे आभार मानले आहेत. ' भारत, चीन, अमेरिका किंवा ब्रिटन यांसह इतर कोणत्याही देशात जिथे ही लस उपलब्ध असेल  तेथून आपल लस घेतली पाहिजे.  लसीसाठी राजकारण होऊ नये. कोरोना लसी पुरवल्याबद्दल मला आमच्या दोन्ही शेजारी देशांचे आभार मानायचे आहेत. चीनने आम्हाला 1.8 दशलक्ष लस दिली आहे तर नवी दिल्लीने 2.1लाख लसीचे डोस पुरवले. दोन्ही देशांनी  आम्हाला  मदत केली आहे. दोन्ही देश आम्हाला वैद्यकीय उपकरणे देखील पाठवित आहेत. यासाठी  मी दोन्ही देशांचे आभार मानतो, असे ओली यांनी म्हटले आहे. 

- भारत आणि नेपाळमधील प्रांतावरील वाद
दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात चीनशी सीमा विवाद सुरू झाल्यानंतर नेपाळनेही आपली भूमिका तठस्थ ठेवली होती.  कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा हे आपले प्रदेश असल्याचे सांगून नेपाळने आपल्या नवीन नकाशामध्ये या भागांचा समावेश केला. नेपाळच्या या नव्या नकाशावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. यानंतर नेपाळी पंतप्रधान ओली यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले. तथापि, आता दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुधारले आहेत. कोरोना संकटाच्या वेळी भारताने शेजारच्या देशाला खूप मदत केली.

Edited By - Anuradha Dhawade 


संबंधित बातम्या

Saam TV Live