भारताचे 3 प्रदेश पळवण्याचा नेपाळचा डाव

साम टीव्ही
सोमवार, 1 जून 2020
  • भारताचे 3 प्रदेश पळवण्याचा नेपाळचा डाव
  • भारताचे 3 भाग दाखवले नेपाळच्या नकाशात
  • अर्ध्या महाराष्ट्राएवढाही नसलेल्या नेपाळचा आगाऊपणा

आता बातमी नेपाळनं भारताविरोधात आखलेल्या डावाची. भारताचे सीमेलगतचे तीन प्रदेश नेपाळनं ह़डपण्याचा कट रचलाय. काय आहे का कट.. पाहा...

भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावात आता नेपाळनेही तेल ओतलंय. कारण नेपाळ सीमेवरचे 3 भाग नेपाळने त्यांच्या नकाशात दाखवलेत. लिंपियाधुरा, कालापानी, आणि लिपुलेख या भारताच्या 3 भागांचा नेपाळने त्यांच्या नकाशात समावेश केलाय. तसं विधेयकच नेपाळच्या संसदेत मांडण्यात आलंय. मुळात या तीनही भागांबाबत चीन-आणि भारतामध्ये 1990 साली व्यापारी करार झालेत. मात्र या कराराकडे सपशेल दुर्लक्ष करत नेपाळने हा आगाऊपणा केलाय.

इवल्याशा नेपाळचा आगाऊपणा का?
लिंपियाधुरा, कालापानी, लिपुलेख हे तीनही प्रदेश सीमा व्यापार केंद्र असतील असा करार भारत आणि चीनमध्ये झाला. हा करार 1990 साली झाला असला तरी त्यावर नेपाळने अद्याप कसलाही आक्षेप घेतला नव्हता. मात्र आता हे तीनही प्रदेश नेपाळनं गुपचूप आपल्या नकाशात दाखवले आहेत.
भारतासह संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढण्यात गुंतलेलं असताना नेपाळनं हा आगाऊपणा केलाय. त्यावर भारतानेही तीव्र आक्षेप घेतलाय. पण नुसता आक्षेप नोंदवून चालणार नाही... तर, आपल्या महाराष्ट्राच्या अर्धाही नसलेल्या पिटुकल्या नेपाळचा हा अगाऊपणा वेळीच मोडायला हवा.


संबंधित बातम्या

Saam TV Live