...यासाठी बबनराव लोणीकर होताहेत ट्रोल!

लक्ष्मण सोळुंके
गुरुवार, 15 एप्रिल 2021

आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी हवेतून ऑक्सिजन शोषणाऱ्या प्लँटचं संशोधन कुठे केलं मला माहित नाही, या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या टिकेवर नेटकऱ्यानी चांगलीच झोड उठवली आहे.

जालना : आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे Rajesh Tope यांनी हवेतून ऑक्सिजन शोषणाऱ्या प्लँटचं संशोधन कुठे केलं मला माहित नाही, या माजी मंत्री बबनराव लोणीकर Babanrao Lonikar यांनी केलेल्या टिकेवर नेटकऱ्यानी चांगलीच झोड उठवली आहे. Netizens Trolling BJP Leader Babanrao Lonikar over his remarks on Rajesh Tope

बबनराव लोणीकर मंत्री असतांना त्यांनी जालना Jalana जिल्ह्यात जिल्हा अधिकारी कार्यालयात आणि जिल्हा परिषद परिसर आणि जिल्ह्यात पाच ठिकाणी हेवेतून शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्लँट Water Plats बसवले. मात्र त्यातवून अद्याप एकही  थेंब पाणी ही पिण्यास मिळाले नसल्याचं म्हणत तुम्ही हवेतून पाणी काढू शकता तर आरोग्य मंत्री हवेतून ऑक्सिजन का काढू शकत नाहीत?असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. लोणीकरांनी ऑक्सिजन प्लँटचा अभ्यास करावाअसा सल्ला देत राज्यासह जालना शहरात असलेल्या ऑक्सिजन प्लँट एकदा पहावा असा सल्ला ही नेटकऱ्यांनी दिलाय.

काय म्हणाले होते लोणीकर
आरोग्यमंत्र्यांनी हवेतून ऑक्सिजन Oxygen शोषणाऱ्या प्लँटचं संशोधन कुठे केलं मला माहित नाही असा प्रश्न उपस्थित करत हवेतून ऑक्सिजन शोषणारा प्लँटबद्दल मी पहिल्यांदाच ऐकलं आहे, अशी टिका राज्याचे माजी स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी राजेश टोपे यांच्यावर काल केली होती. लोणीकर यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली होती. Netizens Trolling BJP Leader Babanrao Lonikar over his remarks on Rajesh Tope

या पत्रकार परिषदेत त्यांनी आरोग्यमंत्र्यांसह राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यात दररोज एक लाख लोक कोरोनाबाधित असून दररोज ५०० कोरोना Corona बाधितांचा मृत्यू होतोय. रुग्णांना ऑक्सिजन,बेडस आणि इंजेक्शन गोरगरिबांना औषधोपचार मिळत नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री आरोग्य सुविधा देण्यात नापास झाल्याची टिकाही लोणीकरांनी टोपेंवर केली होती. कोरोना रोखण्यात राज्य सरकारला Maharashtra पूर्णपणे अपयश आलं असून देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याचा दावा देखील त्यांनी केला केला होता.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live