कामाची बातमी | 'हे' पासवर्ड कधीच ठेऊ नका! नाहीतर असा होऊ शकतो घात

साम टीव्ही
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

 

  • सुमार पासवर्ड टाकाल तर सुरक्षेला मुकाल
  • हे आहेत सर्वात असुरक्षित पासवर्ड
  • हे पासवर्ड करतील तुमचा घात 

अलिकडच्या काळात ऑनलाईन व्यवहार असोत वा कुठे नोंदणी करणं. लॉगिन आणि पासवर्ड या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. मात्र तुम्ही जर सुमार पासवर्ड टाकत असाल तर सुरक्षेला मुकाल. तुमचं अकाऊंट हॅक होऊ शकतं.

अलिकडच्या काळात प्रत्येक गोष्टीसाठी पासवर्ड हा बंधनकारक असतो. अनेक जण सहज लक्षात रहावेत म्हणून पासवर्डसाठी साध्या सोप्या पद्धतीचा अवलंब करतात...पण हीच पद्धत त्यांना महागात पडू शकते. कारण पासवर्ड मॅनेजर कंपनी नॉर्डप्रेसकडून लोकांकडून वापरण्यात आलेल्या सगळ्यात सुमार पासवर्डची यादी देण्यात आलीय.

नॉर्डप्रेस सगळ्यात सुमार पासवर्ड 123456..
हा पासवर्ड सगळ्यात असुरक्षित असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येतंय. याव्यतिरिक्त कंपनीनं इतरही काही पासवर्डची यादी दिलीय. 111111, 12345, 123123, abc 123, i love you, असे पासवर्ड ठेवल्यास तुमची माहिती हॅक होऊ शकते. कोरोनाकाळात असे अनेक प्रकार समोर आलेत.

आयुष्य कॉम्पलिकेटेड असेल तर माणूस खूप वैतागतो. पण जर पासवर्ड कॉम्प्लिकेडेट नसेल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी  फसवणूकीचे शिकार होऊ शकता. म्हणून पासवर्ड हा नेहमी सहज लक्षात  येणार नाही असा कॉम्प्लिकेटेड असावा. सध्याच्या काळात ऑनलाईन पैशांचे व्यवहार किंवा गोपनीय माहिती, वैयक्तीक माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर पासवर्ड महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही जर असे असुरक्षित पासवर्ड ठेवले असतील तर तात्काळ बदला. नाहीतर तुमचीच सुरक्षितता धोक्यात येईल.


संबंधित बातम्या

Saam TV Live