ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करणारे नवीन अँटी-कोविड औषध एका महिन्यात होणार उपलब्ध:  डीआरडीओ वैज्ञानिक

coronavirus
coronavirus

डीआरडीओने DRDO विकसित केलेले नवीन कोविड ओरल औषध हे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना बरे होण्यास मदत करणार आहे आणि त्यांचे पूरक ऑक्सिजन अवलंबन Oxygen Dependence सुद्धा कमी करेल. हैदराबादमध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डीआरडीओ) Dr Reddy’s Laboratories यांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) च्या अग्रगण्य प्रयोगशाळेने, न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस  Nuclear Medicine and Allied Sciences (आयएनएमएएस) - द्वारा 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) Drug 2-deoxy-D-glucose (2-DG) औषध विकसित केले आहे. New anti covid drug to reduce oxygen dependence available in a month announces DRDO scientist

हे ड्रॅग पाउच स्वरूपात येणारे आहे आणि ते औषध पाण्यात विरघळवून तोंडावाटे घेतले जाते. याला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) Drugs Controller General of India तातडीच्या वापरासाठी थेरपी म्हणून मान्यता दिली आहे.

हे देखील पहा -

डीआरडीओ प्रोजेक्ट डायरेक्टर आणि २-डीजीचे वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना Dr Sudhir Chandana यांनी, एन्टी-कोविड -१९ औषधोपचारांच्या रूग्णांवर कार्य कसे करेल याचे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रश्नः आपण 2-डीजी औषध कसे विकसित केले आहे?

डॉ. सुधीर चंदना: एप्रिल २०२० मध्ये कोविड -१९ ची पहिली लाट भारतावर आली तेव्हा आम्ही 2 डीजीवर काम करण्यास सुरुवात केली. आम्हाला आढळले की औषध शरीरातील पेशींमध्ये कोरोनाव्हायरसचा प्रसार थांबवते. अधिक शोधानंतर आम्ही डीसीजीआयला क्लिनिकल चाचण्या घेण्यास परवानगी मागितली. मे २०२० मध्ये आम्हाला क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी मिळाली. ऑक्टोबर २०२० च्या अखेरीस आम्ही चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण केला होता. आणि आम्हाला याचे निकाल फार चांगले मिळाले. कोविड -१९ रुग्णांसाठी 2 डीजी अधिक फायदेशीर ठरेल.

प्रश्नः स्टॅंडर्ड केअर म्हणजे काय?

डॉ. सुधीर चंदना: कोविड रूग्णांच्या उपचारांसाठी रूग्णालयात वापरली जाणारी प्राथमिक काळजी साठी वापरले जनरने औषधोपचार म्हणजेच स्टॅंडर्ड केअर Standard Care होय.

प्रश्नः 2-डीजी औषध सौम्य लक्षणे किंवा मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्रभावी असेल?

डॉ. सुधीर चंदना: आमची चाचणी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मध्यम आणि गंभीर कोविड रूग्णांवर घेण्यात आली. सर्व रुग्णांना याचा फायदा झाला. आणि कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत. तर हे एक सुरक्षित औषध आहे. टप्प्यातील दोन चाचण्यांमध्ये, आम्हाला आढळले की रुग्णांचा रिकव्हरी दर जास्त होता. आणि तिसऱ्या टप्प्यातील आम्ही पूरक ऑक्सिजनवर अवलंबून राहण्याचा कमीपणा आढळून आला.

प्रश्नः 2-डीजी औषधे कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवतात आणि ऑक्सिजनवरील अवलंबन कसे कमी करते?

डॉ. सुधीर चंदना: ग्लूकोज सारखीच 2 डीजी औषध शरीरात पसरते. विषाणू-संक्रमित पेशींमध्ये पोहोचते. आणि विषाणूजन्य संश्लेषण थांबवून विषाणूच्या वाढीस प्रतिबंध करते. आणि त्यांची प्रथिनेची Protein उर्जा उत्पादन नष्ट करते. हे औषध फुफ्फुसांमध्ये पसरलेल्या विषाणूच्या संसर्गावर देखील कार्य करते जे ऑक्सिजनवर रूग्णांचे अवलंबन कमी करण्यास मदत करते.

प्रश्नः हे औषध रुग्णांना कधी उपलब्ध होईल?

डॉ. सुधीर चंदना: हे आमचे उद्योग भागीदार डॉ. रेड्डीच्या प्रयोगशाळेतील आहेत. आम्ही उत्पादन वेगवान करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करीत आहोत. काही आठवड्यात किंवा महिन्याच्या कालावधीत, रुग्णांना औषध उपलब्ध होईल. असे त्यांनी सांगितले आहे. 

प्रश्नः 2-डीजी औषधासाठी आवश्यक असलेले कच्चे माल भारतात उपलब्ध आहेत का किंवा ते आयात केले जाऊ शकते का?

डॉ. सुधीर चंदना: माझ्या माहितीनुसार, औषधांना कच्चा माल उपलब्ध होण्यास काहीच हरकत नाही. रेड्डी लॅब याबद्दल माहिती देईल.

प्रश्नः कोविड प्रकरणातील वाढीवर परिणाम करणारे डीजी 2 डीजीमुळे मृत्यू प्रमाण कमी होईल?

डॉ सुधीर चंदना: चाचण्यांमध्ये भाग घेतलेले सर्व रुग्ण कोविड -१९ पासून बरे झाले आहेत. म्हणून, आम्हाला आशा आहे की कोविड रूग्णांना या औषधाचा फायदा होईल.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com