लातूरकरांसमोर म्युकरमायकोसिसचे नवे संकट, चौघांचा मृत्यू

दीपक क्षीरसागर
बुधवार, 26 मे 2021

लातुर जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूचा आकडा दोन हजाराच्या घरात गेला आहे. हे संकट अद्याप सुरुच आहे. असे असतानाच आता म्युकरमायकोसिसचे नवे संकट लातूरकरांसमोर उभे राहिले आहे.

लातूर : कोरोनाचे Corona संकट अद्यापही घोंघावत असतानाच म्युकरमायकोसिसचे Mucormycosis नवे संकट लातूरकरांसमोर Latur उभे राहिले आहे. या आजाराचे रुग्ण Patients वाढू Increasing लागले आहेत. इतकेच नव्हे तर या आजारामुळे रुग्ण बळीही पडत आहेत. New Crisis Of Mucormycosis In Front Of Laturkar Death Of Four

हे देखील पहा -

आतापर्यंत चौघांचा मृत्यू Death झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १३६ जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली असून, ८१ जणांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असल्याने नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरत आहेत. पण, अद्याप धोका कायम असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

लातुर जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूचा आकडा दोन हजाराच्या घरात गेला आहे. हे संकट अद्याप सुरुच आहे. असे असतानाच आता म्युकरमायकोसिसचे नवे संकट लातूरकरांसमोर उभे राहिले आहे. या आजाराच्या रुग्ण संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. New Crisis Of Mucormycosis In Front Of Laturkar Death Of Four

जिल्ह्यात आतापर्यंत १३६ जणांना हा आजार झाला आहे. सध्या ८१ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील २४ जण हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत आहेत. तर उर्वरित खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत चौघांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा आजार देखील गंभीरच आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे हे महागात पडणारे आहे.

COVID-19 Maharashtra: मागच्या 24 तासात 601 रुग्णांचा मृत्यू

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावर उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा अजूनही सुरुच आहे. प्रशासन त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनामार्फतच खासगी रुग्णालयाला हे इंजेक्शन दिले जात आहे. New Crisis Of Mucormycosis In Front Of Laturkar Death Of Four

आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना ऍम्फोटेरिसीन बी Amphotericin B या इंजेक्शनची गरज आहे. त्याचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा Scarcith आहे. आरोग्य Health विभागाच्या वतीने आतापर्यंत खासगी रुग्णालयांना या इंजेक्शनचा पुरवठा केला जात होता. पण, इंजेक्शन उपलब्ध नसल्याने गेल्या दोन दिवसापासून तो खासगी रुग्णालयांना बंद करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe


संबंधित बातम्या

Saam TV Live