ब्रिटनमधला नवा कोरोना महाराष्ट्रात धडकला...त्या 369 जणांचा शोध सुरु

साम टीव्ही
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020
  • इंग्लंडहून नागपूरात आलेल्या तरुणाला कोरोना
  • नव्या कोरोना व्हायरसची लागण झाल्याची शंका
  • संपर्कात आलेले दहा जण कोरोनाबाधित

इंग्लंडमधून नागपूरात आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने नव्या कोरोनानं नागपूरात धडक दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याच्या संपर्कात आलेले एक दोन नव्हे तर तब्बल दहाजण कोरोना पॉझिटीव्ह आलेयत. त्यामुळे खळबळ उडालीय. खरंच नवा कोरोना भारतात आलाय का? 

इंग्लंडला गेलेला तरुण पुन्हा नागपूरात परतला आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर नागपूरसह सगळ्यांचेच धाबे दणाणले. आधीच इंग्लंडमध्ये नव्या कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. त्यात हा तरुण इंग्लंडला जाऊन आलाय म्हटल्यावर प्रशासनानं खबरदारी म्हणून तरुणाला घरीच राहण्याचे आदेश दिले. पण, थोडे दिवस घरी थांबल्यानंतर तो बाहेर फिरू लागला. कामानिमित्त गोंदियातही जाऊन आला. जवळपास दहा जण संपर्कात आले. त्याची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. तेव्हा तरुणाच्या संपर्कात आलेले 10 जण पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे तरुणाला नव्या कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

कोरोनाची लागण झालेला तरुण पुण्यात एका कंपनीत काम करतो. कंपनीच्या कामानिमित्त महिनाभरापूर्वी इंग्लंडला गेला होता. पुन्हा परतल्यानंतर काही दिवसात कोरोना झाल्याचं आढळून आलं. तरुणाला तात्काळ मेडिकलमध्ये विशेष कक्षात दाखल करण्यात आलंय. तर त्याच्या घशातील आणि नाकातील द्रवाचे नमुने पुण्यातील प्रयोग शाळेत पाठवलेत.

बऱ्याच व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याने कोरोनाचा रुप बदललेला नवीन व्हायरस असल्याची भीती व्यक्त केली जातेय. यामुळे महापालिका, जिल्हा प्रशासनासह मेडिकलच्या डॉक्टरांसह सर्वच अधिकाऱ्यांची चिंता वाढलीय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live