चीनमध्ये कोरोनासारखा आणखी एक खतरनाक व्हायरस, 7 जणांचा मृत्यू, 60 जणांना लागण

साम टीव्ही
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020
  • कोरोनासारखा नवा खतरनाक व्हायरस
  • चीनमध्ये नव्या व्हारसची एण्ट्री
  • ७ जणांचा मृत्यू, ६० जणांना लागण

कोरोनामुळे आधीच जगात मृत्यूचं थैमान सुरु आहे. आणि त्यातच आता एका नव्या व्हायरसची एण्ट्री झालेय. आणि याही वेळेला या व्हायरचा उगम झालाय चीनमध्ये. जगावर येऊ पाहणाऱ्या या नव्या संकटावरचा हा चिंता वाढवणारा रिपोर्ट पाहा.

अख्खं जग कोरोनाशी लढतंय. चीनमधून आलेल्या या खतरनाक व्हायरसनं जगाचं जगणं मुश्कील करुन टाकलंय. अशात चीनमध्ये आता आणखी एका खतरनाक व्हायरसची एण्ट्री झालेय.  SFTS असं या नव्या व्हायरसचं नाव आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झालाय. तर ६० जणांना याची लागण झालेय. चिंताजनक बाब म्हणजे, या व्हारसची लागण कोरोनाप्रमाणेच वेगाने होतेय.

या नव्या व्हायरसच्या एण्ट्रीमुळे फक्त चीनच नाही, तर अख्ख जग धास्तावलंय. कारण कोरोनाचा कहर अद्याप ओसरलेला नाही. 

  • धडकी भरवणारा एसएफटीएस व्हायरस
  • कोरोनाप्रमाणेच या व्हायरसचा वेगाने संसर्ग होतो 
  • चीनच्या जियांग्सूमध्ये या व्हायरसमुळे रुग्ण वाढतायत
  • या वर्षाच्या सुरुवातीला एका महिलेला संसर्ग झाला होता
  • त्यानंतर ७ जणांचा मृत्यू झालाय आणि ६० जणांना लागण झालेय 
  • कोरोनामुळे जगात १५ सेकंदाला एक माणूस मरतोय. अख्ख जग चीनच्या नावाने बोटं मोडतंय..अशात या नव्या व्हायरसच्या एण्ट्रीमुळे पुन्हा टेन्शन वाढलंय.


संबंधित बातम्या

Saam TV Live