अंमली पदार्थ शोधणाऱ्या 19 श्वानांची रेल्वे सुरक्षा दलात होणार भरती.

सुमित सावंत
सोमवार, 29 मार्च 2021

रेल्वेतील संभाव्य अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आता रेल्वेच्या श्वान पथकात नवीन 19 प्रशिक्षित श्वान घेतले जाणार आहेत . या आधी बॉम्ब शोधणारे श्वान पथक  होते. मात्र त्यांना अमली पदार्थांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण नव्हतं, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय .​

मुंबई : रेल्वेतील संभाव्य अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आता रेल्वेच्या श्वान पथकात नवीन 19 प्रशिक्षित श्वान (Dog Squad) घेतले जाणार आहेत . या आधी बॉम्ब शोधणारे श्वान पथक  होते. मात्र त्यांना अंमली पदार्थांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण नव्हतं, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. New Dogs will be incorporated in Railway Squad for Drugs Detection

रेल्वे (Indian Railways) मार्गाने अंमली पदार्थ (Drugs) तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे अवैधरित्या होणाऱ्या तस्करींवर आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाच ते सात श्वान पथक आता तैनात केले जाणार आहे. अंमली पदार्थाची होणारी तस्करी (Smuggling) रोखणारे श्वान सध्या मुंबई विभागात येणार आहेत. यासाठी एकूण 36 श्वानाची संख्या स्वीकृत करण्यात आली होती.

यातील सर्वाधिक श्वानांना बॉम्ब शोधण्याचं अधिकृत प्रशिक्षण देण्यात आले होते. तर यातील 7 श्वान हे निवृत्त झाले आहेत. कोरोनामुळे त्यांच्या जागी नवीन श्वानांची आतपर्यंत नियुक्ती झालेली नव्हती. पण आता निवृत्ती होणाऱ्या श्वानांच्या जागी आणि इतर अन्य नवीन 9 श्वान असे मिळून १९ श्वान लवकरच मुंबई विभागासाठी आणि संपूर्ण मध्य रेल्वेच्या श्वान पथकाकरिता घेतले जाणार आहेत. तसा प्रस्ताव सुद्धा मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने तयार केला आहे अशी माहिती आहे. New Dogs will be incorporated in Railway Squad for Drugs Detection

आरपीएफच्या पथकात नऊ डॉबरमन, लेब्रोडोर रिट्रीवर (स्निपर), जर्मन शेफर्ड श्वान भरती होणार आहेत . तर, यापैकी दोन श्वान गांजा, चरस, एमडी तस्कऱ्यांच्या होणाऱ्या हालचालींवर कायम लक्ष ठेवून असणार आहेत. 15 एप्रिलपर्यंत मध्य रेल्वेच्या आरपीएफच्या पथकात हे श्वान भरती होतील . त्यानंतर या श्वानांना आठ महिन्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात येईल.

Edited By - Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live