सावधान - कोरोना विषाणू हवेतून पसरु शकतो १० मीटरपर्यंत

विहंग ठाकूर
गुरुवार, 20 मे 2021

कोरोना विषाणू हा हवेच्या माध्यमातूनही पसरतो. आता सरकारनेही हे पूर्णपणे मान्य केले आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमुख कारण आहेत

नवी दिल्ली : कोरोना विषाणू हा हवेच्या माध्यमातूनही पसरतो. आता सरकारनेही हे पूर्णपणे मान्य केले आहे. सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या म्हणण्यानुसार एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स हे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमुख कारण आहेत. New Guidelines by Central Government about Corona Virus

कोरोना-संक्रमित व्यक्तीचे ड्रॉपलेट्स हवेमध्ये दोन मीटर पर्यंत प्रवास करू शकतात, तर एयरोसोल त्या थेंबांना १० मीटर पर्यंत ढकलू शकतो आणि त्यामुळे  संसर्गाचा धोका असू शकतो. येथे एक संक्रमित व्यक्ती  ज्यात  कोरोनाची लक्षण दिसत  नसली तरी  तो 'व्हायरल लोडिंग' बनवून , इतर  लोकाना संक्रमित करू शकतो. याचा अर्थ  असा की , कोरोना  पासून  वाचण्यासाठी  १० मीटर  अंतर पुरेसे नाही. 

हे देखिल पहा

केंद्र  सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या मते, संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासामुळे, बोलणे, हसणे, खोकणे आणि शिंकणे , लाळ , यामुळे इतरांनाही संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच, संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी कोविड नियमांचे  पालन करणे फार महत्वाचे आहे. मास्क वापर , सुरक्षित शारीरिक अंतर ठेवा आणि हात धुवत  राहा, असे सतत सांगितले जात आहे. New Guidelines by Central Government about Corona Virus

माजी महिला क्रिकेटरला विराट कोहलीची लाख मोलांची मदत

सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार बंद  इनडोअर स्पेसमधील एयरोसोल आणि ड्रॉपलेट्स मुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. गाईड लाईन मधे  लोकांना अधिक धोका असलेल्या अशा पृष्ठभागाची वारंवार आणि नियमित साफसफाईची करण्यास  सांगितले आहे. यात डोर हँडल, लाईट स्विच, टेबल, खुर्ची इ. समाविष्ट आहे. त्यांना ब्लीच आणि फिनाईल इत्यादीने स्वच्छ करण्याची शिफारस केली जाते. मार्गदर्शक तत्वानुसार, काच, प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर हा विषाणू बराच काळ जिवंत राहतो. म्हणून या गोष्टींची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे
Edited By - Amit Golwalakr


संबंधित बातम्या

Saam TV Live