नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी-रविवारी मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहणार

साम टीव्ही ब्युरो
शनिवार, 3 एप्रिल 2021

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत 15 एप्रिल पर्यंत  जिल्ह्यात सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे

नंदुरबार: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोणा बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत 15 एप्रिल पर्यंत  जिल्ह्यात सक्त संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. New guidelines under Janata Curfew in Nandurbar 

सोमवार ते शुक्रवार पर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर  शनिवार-रविवार संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यू (Janata Curfew) लागू करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस जनता कर्फ्यू दरम्यान अत्यावश्यक सेवेत मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती पोलीस (Police) अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. सकाळी सात ते नऊ दरम्यान दूध (Milk) व वृत्तपत्र (Newspaper)  विक्रीशिवाय इतर सर्व व्यवहार दोन दिवस बंद राहणार आहे.

जनता कर्फ्यू दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई (Strict actions) सुरू केली असून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात नमूद केलेल्या व्यापारी संकुलांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. New guidelines under Janata Curfew in Nandurbar 

Edited By- Sanika Gade. 


संबंधित बातम्या

Saam TV Live