कामाची बातमी | उद्यापासून लागू होणार नवे कर्जदर, भविष्यात RBIकडून आणखी व्याजदर कपातीची शक्यता

साम टीव्ही
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020
  • बँक ऑफ महाराष्ट्रची व्याजदरात कपात
  • इंडियन ओव्हरसीज बँकेच्याही कर्जदरात कपात
  • उद्यापासून लागू होणार नवे कर्जदर
  • भविष्यात RBIकडून आणखी व्याजदर कपातीची शक्यता

बातमी आहे कर्जधारकांना दिलासा देणारी. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकांनी. MCLRमध्ये ०.१० टक्के कपात केलीय. नवा कर्जदर उद्यापासून लागू होणार आहे. यामुळे इंडियन ओव्हरसीज बँकेचा एक वर्षे मुदतीच्या एमसीएलआर कर्जाचा दर.

आता ७.६५ टक्क्यांवरून ७.५५ टक्क्यांवर आलाय. बँक ऑफ महाराष्ट्रनेही  एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआर कर्जांचा दर ७.४० वरून ७.३० टक्के केलाय. भविष्यात देखील व्याज दरात कपात केली जाईल, असे संकेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच दिले होत. RBIने गेल्या दोन पतधोरकणात व्याजदरात १.१५ टक्के इतकी कपात केलीय.

पाहा सविस्तर माहिती -


संबंधित बातम्या

Saam TV Live