लाॅकडाऊनची नवी नियमावली; अत्यावश्यक सेवेतली दुकाने स. ७ ते ११च सुरु राहणार

साम टीव्ही ब्युरो
मंगळवार, 20 एप्रिल 2021

राज्यातील राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखीन कडक केले.  राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नवे नियम लागू असणार आहेत.

मुंबई: महाराष्ट्र मध्ये पूर्ण लॉकडाऊन लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. आज याबाबत नि समजत आहे.  सक्तीचे लॉकडाऊन करण्याची मदत आणि पुनर्वसन मंत्री यांची मागणी होती. 

महाराष्ट्रात लाॅकडाऊन बाबत कडक भूमिका सध्या राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. कारण मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं होत. आता नव्या निर्णयानसार सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत  आवश्यक सेवेची दुकाने राहणार आहेत. त्या वेळेनंतर मात्र कडक लॉकडाऊन सर्वत्र लागू करण्यात येईल. अश्या भूमिकेत सध्या राज्य सरकार असल्याचे दिसत आहे. Guidelines of Lockdown in Maharashtra

नवीन नियमावली जाहीर: 

राज्यातील राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखीन कडक केले.  राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत नवे नियम लागू असणार आहेत. राज्यातील सर्व किराणा दुकाने, फळ दुकाने, डेअरी बेकरी सर्व खाद्य दुकाने कृषि उत्पन्नाशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने ही दररोज सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू राहतील.  त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकानं बंद राहणार आहेत.  

मात्र या दुकानांना सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासनाला त्यांच्या वेळ वेळ यांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेता येईल असे राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.  राज्यातील रुग्णालयांमध्ये  कमी असलेल्या आरोग्यसुविधा वाढवणे,  ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणी दूर करणे. आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

काय आहेत नवे नियम:
आता राज्यात  सर्व किराणा, फळविक्रेते, भाज्यांची दुकानं, सर्व प्रकारचे खाद्य दुकान (चिकन मटण पोल्ट्री मासे आणि अंडी) सहित डेअरी, बेकरी कृषी क्षेत्राशी निगडीतनिगडीत सर्व दुकाने पाळीव प्राण्यांची खाद्य असलेली दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत म्हणजेच चार तास सुरू ठेवता येणार आहेत.

वरील सर्व दुकानांना सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी चालू करण्याची मुभा सरकारने दिली आहे.  त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला संबंधित क्षेत्रातील परिस्थिती पाहून दुकानांच्या वेळा काय ठेवायच्या याबाबत निर्णय घेता येणार आहे. 
काय बंद राहणार:

  1. राज्यात सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असलेले इतर कडक निर्बंध हे मात्र कायम सारखेच असणार आहेत.
  2. राज्यातील सर्व सलून आणि ब्युटीपार्लर पूर्णपणे बंद असणार आहेत. 
  3. शाळा-महाविद्यालय, शॉपिंग मॉल्स हे सर्व पूर्णपणे बंद राहतील. 
  4. खेळाचे स्टेडियम आणि क्रीडा संकुल देखील बंद राहणार आहेत. 
  5. धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद राहतील तर धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनात देखील परवानगी दिलेली नाही. 
  6. विवाहासाठी मात्र आता केवळ 25 माणसाच्या उपस्थिलाच परवानगी देण्यात आली आहे. 
  7. अंत्यसंस्कारासाठी केवळ वीस माणसांच्या उपस्थितीला आता परवानगी देण्यात आली आहे. 
  8. तसेच सर्व खासगी कार्यालये सुद्धा बंद राहतील. 
     

संबंधित बातम्या

Saam TV Live