नांदेड जिल्ह्यात ऑक्सिजन मुबलक, पालकमंत्री अशोक चव्हाण यांची माहिती..

Ashok Chavan
Ashok Chavan

नांदेड : जिल्ह्यात ऑक्सिजनची Oxygen कमतरता नाही. दोन ठिकाणी मॅनिफॅकचरींग युनिट उभारले जात असल्याची आणि जिल्हयातील तालुकास्तरावर १३ ठिकाणी छोट्या स्वरुपात ऑक्सिजन साठवणुकीचे युनिट उभारण्यात येणार असल्याची माहिती अशोक चव्हाण Ashok Chavan यांनी दिली आहे. New Oxygen Plants being Installed in Nanded say Ashok Chavan

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi मोठा गाजावाजा करत टिका महोत्सवाची घोषणा केली. मात्र सर्वत्र व्हॅक्सिन Corona Vaccine उपलब्ध नसल्याने व्हॅक्सिनेशन केंद्र बंद असल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे, असेही चव्हाण म्हणाले.

नांदेडचे Nanded पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी स्वतः या बाबत कबुली दिली आहे. जिल्ह्यात ४००  ठिकाणी व्हॅक्सिनेशन केंद्र सुरू केले आहेत.  मात्र आता व्हॅक्सिनचा तुटवडा भासू लागल्यानं २०० व्हॅक्सिनेशन केंद्र बंद पडली आहे, असे सांगत चव्हाण यांनी मोदींनी आवाहन केल्याप्रमाणे टिका महोत्सवाची तयारी केल्याचे खोचकपणे सांगितले. New Oxygen Plants being Installed in Nanded say Ashok Chavan

कोरोनासाठी Corona प्रभावी इंजेक्शन ठरत असलेल्या  रेमडिसिवीर Remedesivir इंजेक्शनच्या मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत आहे.  तसेच रेमडिसीवीर इंजेक्शनची कमतरता भासत आहे. ही वस्तुस्थिती असल्याचं पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्य केल आहे.  अशी परिस्थिती दोन- तीन दिवसात सुधारेल असं आम्हाला सरकारकडून सांगण्यात येत असल्याचेही चव्हाण यावेळी नांदेड मध्ये म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com