सर्व बँकाना हा नवीन नियम लागू, पाहा काय आहे हा नवीन नियम...

सिद्धी चासकर
बुधवार, 17 मार्च 2021

ग्राहकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जाव लागत आहे..यामध्ये अधिक वेळही जातो आणि चेक कलेक्शन मध्ये खर्च ही होतो सीटीएसची वाढलेली व्याप्ती कमी करण्यासाठी आणि ग्राहाकांना अनुभव देण्यासाठी बँकामध्ये ही सिस्टीम लागु होणार आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने सर्व बँकांना चेकची नवीन सिस्टीम लागू करण्यास सांगितल आहे ही सिस्टीम लागू करण्याची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत सर्व बँकांना दिली आहे 'चेक ट्रंकेशन सिस्टीम' ही आता लवकरच सर्व बँकांना लागू करण्यात येणार आहे हे सिस्टीम लागू केल्याने चेक क्लिअरन्ससाठी लागणारा वेळ आता कमी होणार आहे या आधी हे सिस्टीम २०१० पासुन सुरू करण्यात आलं होत मात्र आता आरबीआय च्या नवीन आदेशानुसार सगळ्या ब्रांचमध्ये ही सिस्टीम लागू करावी लागणार आहेत रिझर्व्ह बँकेकडून सर्व बँकांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना एक पत्र पाठवण्यात आलं आहे बँकांच्या काही शाखांना चेक क्लिअरन्स सिस्टीममधून बाहेर ठेवण्यात आल्याच दिसुन आलंय.

ग्राहकांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरे जाव लागत आहे..यामध्ये अधिक वेळही जातो आणि चेक कलेक्शन मध्ये खर्च ही होतो सीटीएसची वाढलेली व्याप्ती कमी करण्यासाठी आणि ग्राहाकांना अनुभव देण्यासाठी बँकामध्ये ही सिस्टीम लागु होणार आहे

चेक ट्रंकेशन सिस्टीम चेक कलेक्शन प्रक्रिया आधिक वेगाने होते यामुळे ग्राहकांना आणखीन चांगली सुविधा देण्यास मदत होईल त्याच बरोबर चेक रक्कम तात्काळ क्लिअर झाल्यावर ग्राहकांना लवकर पैसेही मिळतील तसाच होणारा खर्च देखील कमी होईल आणि लॉजिस्टीक्सशी संबंधीत समस्या कमी करण्यास मदत होईल त्यामुळे याचा फायदा बँकांनाही होईल.त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने सर्व बँकांना चेकची ही नवीन सिस्टीम लागू करण्यास सांगितल आहे

साम टीव्ही.


संबंधित बातम्या

Saam TV Live