१ मे पासून लसीकरणासाठीचे 'हे' आहेत काही नवीन नियम (पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

संपूर्ण देशात १६ जानेवारी पासून लसीकरण मोहीम सुरू झाली. तसेच आता अठरा वर्षावरील सर्व नागरिकांना कोविन ॲपवर आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

मुंबई: संपूर्ण देशात १६ जानेवारी पासून लसीकरण मोहीमेला सुरवात झाली. तसेच आता अठरा वर्षावरील सर्व नागरिकांना कोविन ॲपवर Cowin app आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण Vaccination मोहीम राबवली जात आहे. New rules under Covid vaccination Starting from 1st May

एक मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना आता लस देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शनिवारपासून नोंदणीसाठी सुरुवात होणार आहे. शिवाय लसीकरण मोहिमेत लसीचा साठा कमी पडू नये यासाठी लस खरेदीच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. राज्यांना लस निर्मात्यांकडून थेट लसीचा साठा आता विकत घेता येणार आहे.  त्या शिवाय सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर लस मोफत Free देण्यात येईल. तर खाजगी रुग्णालयात पारदर्शकपणे लसीसाठी सेल्फ सेट कॉस्टची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. New rules under Covid vaccination starting from 1st May

लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची या संदर्भात माहिती:

  • cowin.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक किंवा  आधार नंबर टाका. 
  • तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी ॲपवर टाका. 
  •  लॉग इन नंतर नोंदणी केलेल्यांची यादी आणि कॅलेंडर दिसेल. 
  • कॅलेंडर वर आपल्या सोयीची तारीख निवडा.
  • तुमचे राज्य, जिल्हा, शहर, वाद, पिन नंबर तेथे व्यवस्थित नमूद करा. 
  • नोंदणी करताना केवायसी, ओळखपत्र, स्कॅन करून जोडणे आवश्यक. 
  • लसीकरणासाठी हवी ती वेळ निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live