बोलायला त्रास, चव ओळखता न येणं हीदेखील कोरोनाची लक्षणं? वाचा नेमकं काय होतं...

साम टीव्ही
रविवार, 17 मे 2020
  • कोरोना व्हायरसची आणखी लक्षणं समोर
  • जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
  • बोलायला त्रास, चव ओळखता न येणं हीदेखील कोरोनाची लक्षणं ?

कोरोना व्हायरसचं आणखी एक खतरनाक लक्षण समोर आलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं यासंबंधी इशारा दिलाय. कोणतं आहे हे लक्षण ? चला पाहुयात

कोरोना व्हायरसबद्दल रोज नवीन माहिती समोर येतेय. आता कोरोनाची काही नवीन लक्षणं समोर आलीयेत. जागतिक आरोग्य संघटनेनं या लक्षणांसंबंधी इशारा दिलाय. तज्ज्ञांच्या मत कोरोना संक्रमित व्यक्तींना बोलताना बराच त्रास होतो. धक्कादायक म्हणजे अनेकदा हे लक्षणं सर्वात शेवटी समोर येतं. कोरोना रुग्णाला बोलायला, तसंच कधी कधी ऐकायलाही त्रास होतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. चव ओळखायलाही कोरोना रुग्णाला त्रास होतो, असं संशोधन समोर आलंय.

लक्षणं न दिसण्याच्या कोरोनाच्या गुणधर्मामुळे याचा सर्वात वेगानं प्रसार होतोय. त्यातच आता कोरोनाची नवीन लक्षणं समोर आली आहेत. म्हणूनच कोरोनासंबंधी कोणतंही लक्षण दुर्लक्षित करुन चालणार नाही. 


संबंधित बातम्या

Saam TV Live