लॉकडाउन काळात उत्पन्न वाढीसाठी विठ्ठल मंदिर समितीचा नवा उपक्रम...

भारत नागणे  
बुधवार, 2 जून 2021

लॉकडाउन  पंढरपूर येथील  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. यावर पर्याय म्हणून मंदिर समितीने स्वतःचे  उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिमा तयार करुन त्यांची विक्री करण्याचा उपक्रम सुरु केला आहे

पंढरपूर : लॉकडाउन मध्ये पंढरपूर Pandharpur येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. यावर पर्याय म्हणून मंदिर समितीने स्वतःचे  उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिमा तयार करुन त्यांची विक्री करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. New venture of Vitthal Mandir Samiti

समितीच्या या उत्पन्नवाढीच्या नव्या उपक्रमाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पाचशे हून अधिक प्रतिमांची नोंदणी आतापर्यंत झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. परिणामी मंदिर समितीच्या उत्पन्नावर  मोठा परिणाम झाला आहे. 

लॉकडाउन Lockdown काळात मंदिराचे  तब्बल 27 कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. एकीकडे मंदिराच्या उत्पन्नात कमालीची घट झाली असताना दुसरीकडे मात्र, मंदिर समितीचा दैनंदिन खर्च सुरुच आहे. उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याने समितीचे आर्थिक गणित Mathematics बिघडले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मंदिर समितीचे मुख्याधिकारी विठ्ठल जोशी यांनी उत्पन्न वाढीसाठी देवाच्या प्रतिमा तयार करुन त्यांची विक्री करण्याचा एका चांगला पर्याय शोधून काढला आहे. New venture of Vitthal Mandir Samiti

शिर्डीतील साई मंदिराचे अर्थकारण ठप्प; दानात मोठी घट 

गेल्या तीस वर्षापूर्वी विठ्ठल रुक्मिणीचे फोटो काढून त्यांची विक्री Sale केली जात होती.यामध्ये बदल करुन मंदिर समितीने व्यवसायिक फोटोग्राफी Photography कडून देवाचे फोटो Photo काढून त्यांच्या प्रतिमा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. देवाच्या विविध 31 रुपातील आणि पोषाखातील सुमारे 72 हजार प्रतिमा तयार केल्या आहेत. एकूण सहा प्रकारामध्ये देवाच्या प्रतिमा तयार करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 500 प्रतिमा तयार करण्यात आले आहेत. 

वाटरफ्रूप आणि चांगल्या दर्जाच्या  या प्रतिमा 100 रुपया पासून ते 2 हजार रुपयांमध्ये भाविकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. देवाच्या प्रतिमा तयार करण्यासाठी समितीने व्हाॅट लाईन ही अत्याधुनिक प्रिंटीग मशीन Printing machine खरेदी केली आहे. या मशिनद्वारे देवाच्या विविध रुपातील मनमोहक व सुंदर अशा प्रतिमा तयार करण्यात येत आहेत. प्रतिमा तयार करण्यासाठी समितीच्या आठ कर्मचार्यांना तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे. New venture of Vitthal Mandir Samiti

हे देखील पहा 

फोटोसाठी लवकरच एक शोरुम तयार कऱण्यात येणार आहे. भाविकांच्या मागणीनुसार विविध रुपातील विठुरायाच्या  प्रतिमा तयार करुन देण्यात येणार आहेत. यासाठी  मंदिर समितीने ऑनलाईन Online खरेदीची  सुविधा देखील सुरु केली आहे. मंदिर समितीने उत्पन्नवाढीसाठी सुरु केलेल्या या उपक्रमाचे वारकरी भाविकांमधून स्वागत केले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

 


संबंधित बातम्या

Saam TV Live