राजीव सातव यांच्या शरीरात नवा व्हायरस 

rajiv satav
rajiv satav

मुंबई - काँग्रेस Congress नेते राजीव सातव  Rajiv Satav यांची तब्बेत नाजुक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या शरीरात सायटोमॅगीलो cytomegalovirus हा नवा व्हायरस सापडला असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.उद्या त्यांची दवाखान्यात जाऊन भेट घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश Rajesh Tope टोपे यांनी दिली. New virus in Rajiv Satav's body

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi हे राज्यातील 17 जिल्ह्यातील कोरोनाबधितांची रुग्णसंख्या जास्त असल्याने त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सवरून Video Conference संवाद साधणार असून त्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. या बैठकीसाठी नियोजन करण्याचं काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हे देखील पहा -

राज्यात मृत्युदर जास्त आहे. लोक अंगावर दुखणं काढत असून उशिरा उपचार घेत आहे त्यामुळे मृत्युदर वाढल्याचे टोपे म्हणाले. हे टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटली असून यापुढे देखील संख्या कमी येत राहावी अशी अपेक्षा करू असंही ते म्हणाले.  New virus in Rajiv Satav's body

कोविशिल्डचा दुसऱ्या डोस मधील अंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वाढवण्यात आलं असून आता दोन डोस मधील अंतर हे 3 ते 4 महिने असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे . 45 वर्षांच्या वरील नागरीकांना लस देण्यासाठी प्राधान्य राहील. या संदर्भात आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या असून केंद्राकडून उपलब्ध होईल त्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम ठरवला जाईल असंही टोपे म्हणाले.     

काल झालेल्या बैठकीत खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी ८० टक्के बेडस राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बिलाची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. रुग्णांना फ्री ऑफ कॉस्ट अँबुलन्स द्या यावर निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्युकरमाइकोसिस आजारासाठी लागणारे अँफोटेरिसिन बी नावाचे एक लाख इंजेक्शन खरेदीसाठी आज संध्याकाळ पर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार असून हाफकीन मार्फत ही प्रकृती पूर्ण केली जाणार आहे.आज संध्याकाळी 5 हजार इंजेक्शन राज्यभरातील म्युकरमाइकोसिस च्या रुग्णांपर्यंत पोहचवले जाईल असेही ते म्हणाले. New virus in Rajiv Satav's body

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com