कोरोनाच्या संकटकाळात गोष्ट कोरोनाशी लढा देणाऱ्या हिरोंची...या हिरोंना साम टीव्हीचा सलाम!

साम टीव्ही
शनिवार, 16 मे 2020

त्यांनी कारगिलच्या युद्धात धैर्यानं लढा दिला. इतकंच काय, तर त्यांनी कारगिलवर विजयी पताकाही फडकावली. ते दोघे आता सेवेतून निवृत्त झालेत..

त्यांनी कारगिलच्या युद्धात धैर्यानं लढा दिला. इतकंच काय, तर त्यांनी कारगिलवर विजयी पताकाही फडकावली. ते दोघे आता सेवेतून निवृत्त झालेत. पण ते आता कोरोनाविरोधात धीरोदात्तपणे उभे ठाकलेत. कोण आहेत ते दोघे वीर. पाहूयात साम हीरो..

हे चित्र पाहून धुळ्यात लष्कराला पाचारण करण्यात आलंय की काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, मंडळी जरा थांबा. 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या रखरखत्या उन्हात रस्त्यावर उभे ठाकलेले हे आहेत जितेंद्र माळी आणि सुनील निकम. कोरोनाच्या लढ्यात ते निधड्या छातीनं सेवा बजावतायत. धुळे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पोलिसांच्या मदतीसाठी तरुणांना आवाहन केलं आणि हे दोघेही लगोलग रस्त्यावर उतरले.

खरंतर हे दोघेही भारतीय लष्करातून निवृत्त झालेले सैनिक. कारगिलच्या युद्धात शत्रूच्या नरडीवर पाय ठेवून त्यांनी भारताची विजयी पताका फडकावलीय. हे दोघेही आता भारतीय लष्कराच्या सेवेतून निवृत्त झालेत. मात्र तरीही कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या या दोघांनी कोरोनाविरोधात कंबर कसलीय. जितेंद्र माळी आणि सुनील निकम यांनी पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन सेवा सुरू केलीय. तीही एकही नया पैसा न घेता... 

कुटुंबाचा त्याग करत आयुष्यभर भारताच्या शत्रूविरोधात झुंजलेले जितेंद्र माळी आणि सुनील निकम प्रखर राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहेत. देशावर कोणतंही संकट आलं तरी जीवाची पर्वा न करता भारतीय सैनिक मैदानात उतरतो. कारण लढवय्या बाणा त्यांच्या रक्तातच असतो. म्हणूनच देशावर चाल करून आलेल्या शत्रूला लोळवून टाकणारे हे शूरवीर, कोरोनाविरोधातही तितक्याच हिमतीने उभे ठाकलेत. या दोन्ही साम हीरोंना कडक सॅल्यूट. जय हिंद

Web Title - news about army heroes in corona 


संबंधित बातम्या

Saam TV Live