मानाच्या या पालख्यांची पायी दिंडी कोरोनामुळे रद्द

साम टीव्ही
गुरुवार, 21 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सोहळे रद्द करण्यात आलेत. वारी सोहळ्यासंदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय 30 मे रोजी होणार आहे. मात्र मानाच्या सात पालख्यांपैकी 4 पालख्यांनी पायी दिंडी सोहळा रद्द केलाय .

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सोहळे रद्द करण्यात आलेत. वारी सोहळ्यासंदर्भात देखील महत्त्वाचा निर्णय 30 मे रोजी होणार आहे. मात्र मानाच्या सात पालख्यांपैकी 4 पालख्यांनी पायी दिंडी सोहळा रद्द केलाय .

जेष्ठ महिन्यातील पेरण्या उरकल्यानंतर. वारकऱ्यांना वेध लागलात. पंढरीचे मायबाप विठुरायच्या चरणावर माथा टेकवण्याची वाट हा वारकरी वर्षभर पाहत असतो. ध्यानी मनी विठ्ठल वसलेल्या वारकऱ्यांच्या वाटेत यंदा कोरोना उभा आहे. जगावार कोरोनाचं सावट आहे. आपला देश आपला महाराष्ट्र या कोरोनाच्या सावटातून सुटला नाही. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. गर्दीमुळं अनेक सोहळे रद्द करण्यात आलेत. या मुळं यंदा वारीत पालखी सोहळा होईल का यावर प्रश्नचिन्ह आहे.  

 महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून असंख्य पालख्या पंढरीच्या दिशेनं येत असंतात. मानाच्या सात पालख्यांपैकी चार पालख्यांनी यंदा पायी दिंडी सोहळा रद्द केलाय. 
या चार संताचा पायी दिंडी सोहळा रद्द
श्री संत एकनाथ महाराज, पैठण
श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्रम्बकेश्वर
श्री संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव
श्री संत सोपान काका, सासवड

 

व्हिओ- या पालख्यांचा पायी दिंडी सोहळा रद्द झाला असला तरी आणि विठ्ठल पंढरपुरात उभा असला तरी तो प्रत्येकाच्या मनात आहे. आपल्याला वारीत चालता येत नाही म्हणून, माऊली नाराज होऊ नका. विठ्ठ्ल आपल्या मनात आहे. कारण तुकोबांनीच सांगून ठेवलंय . जेथे जातो तेथे ... तू माझा सांगाती मग आपण वारीत असू वा घरी ... राम कृष्ण हरी


संबंधित बातम्या

Saam TV Live