मुंबईत करोनाचे 10 रुग्ण

 मुंबईत करोनाचे 10 रुग्ण


 मुंबई: करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या मुंबईतील रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. मुंबईबाहेरील रुग्णांची संख्या चार असून एकूण नऊ रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईबाहेरील चार रुग्ण हे ठाणे, वाशी, कामोठे आणि कल्याण परिसरातील असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

करोनाच्या प्रादुर्भावानंतर मानसिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो हे लक्षात घेऊन पालिकेने रुग्णालयातील हेल्पलाइनमधील समुपदेशकांना ड्युटीच्या वेळांचे नियोजन करण्यास सांगितले आहे. मानसोपचारतज्ज्ञांची उपलब्धता आणि समुपदेशकांची सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.


शनिवारी आणि रविवारी मुंबईतील वर्दळ ही इतर दिवसांच्य तुलनेमध्ये कमी असते, हे लक्षात घेऊन पालिकेच्या वैद्यकीय कर्मचारी, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुंबई पिंजून काढण्याचे ठरवले आहे. सोसायट्यांच्या सदस्यांसोबत बैठका घेऊन निवासी परिसरामध्ये इतर देशांतून आलेल्या रहिवाशांच्या नोंदी घेणे, त्यांच्या तपासण्या करणे यासाठी सूचना करण्यात येणार आहेत.

मुंबईबाहेरील रुग्णांची संख्या चार असून एकूण दहा रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईबाहेरील चार रुग्ण हे ठाणे, वाशी, कामोठे आणि कल्याण परिसरातील असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या मुंबईतील रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. 


करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या (पॉझिटिव्ह) चार रुग्णापैकी एक महिला ही हिंदुजा रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी आहे. हिंदुजा रुग्णालयातील आठ संशयित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे रुग्णालयामध्येच विलगीकरण करण्यात आले होते. तपासणीअंती त्यातील तिघांना या विषाणूची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंदुजा रुग्णालयातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचेही विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यामध्येही या विषाणूची लक्षणे दिसून आलेली नाहीत. राज्याच्या साथ रोग नियंत्रण कक्षाला या रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. तसेच हिंदुजा रुग्णालयातील इतर ८ रुग्णांची चाचणी केली असून त्यांनाही या विषाणूची लागण झाली नसल्याचे दिसून आले. या सर्वांना घरीच वेगळे राहण्यास सांगण्यात आले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
 

WebTittle :: 10 coronary patients in Mumbai


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com