उद्या 3,700 रेल्वे आणि 1 हजार उड्डाण रद्द  

 उद्या 3,700 रेल्वे आणि 1 हजार उड्डाण रद्द  

नवी दिल्लीः आज मध्य रात्रीपासून आणि उद्या रात्री १० वाजेपर्यंत एकही पॅसेंजर ट्रेन धावणार नाही. यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या सुमारे २४०० फेऱ्या रद्द होणार आहेत.मेल आणि एक्स्प्रेसच्या सुमारे १३०० फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबादमधील उपनगरीय लोकल गाड्यांच्या सेवेत मोठ्या संख्येत कपात केली गेलीय. रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये पॅसेंजरसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही समावेश आहे.  मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधील कॅटरिंग सेवाही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत. तसंच कॅटरिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचे आवाहन कॅटरर्सला रेल्वेने केले आहे. सर्व रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जन आहार आणि सेल किचन बंद ठेवण्याचे आदेश आयआरसीटीसीने दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या म्हणजे रविवारी २२ मार्चला १४ तासांच्या जनता कर्फ्यूचं आवाहन केलंय. एकीकडे रेल्वेने रविवारी ३, ७०० रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तर इंडिगो, गोएअर या विमान कंपन्यांनी १ हजार उड्डाणं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.


रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये पॅसेंजरसह मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचाही समावेश आहे. आज मध्य रात्रीपासून आणि उद्या रात्री १० वाजेपर्यंत एकही पॅसेंजर ट्रेन धावणार नाही. यामुळे पॅसेंजर ट्रेनच्या सुमारे २४०० फेऱ्या रद्द होणार आहेत. तर मेल आणि एक्स्प्रेसच्या सुमारे १३०० फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबादमधील उपनगरीय लोकल गाड्यांच्या सेवेत मोठ्या संख्येत कपात केली गेलीय. यामुळे कमीत कमी लोकल धावणार आहेत.
 

WeTittle ::  3,700 trains and 1,000 flights canceled tomorrow


 

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com