गोंदियात घरातून 8 लाख 40 हजार रूपयांच्या 70 किलो गांजा पकडला

गोंदियात घरातून 8 लाख 40 हजार रूपयांच्या 70 किलो गांजा पकडला
ganja

गोंदिया: एकीकडे लॉकडाऊन Lockdown असताना सुद्धा कोणाला भनक देखील लागू न देता 70 किलो 250 ग्राम गांजाची Hemp  घरात साठवणूक केल्याचा प्रकार गोंदियाच्या रावणवाडी परिसरातील कामठा Kamtha येथे उघडकीस आला आहे.

हे देखील पहा -

या प्रकरणी घरमालकाला गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने Local Crime Branch अटक केली आहे. धनश्याम उर्फ मोनू अग्रवाल वय 25 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या कडून 8 लाख 43 हजार रूपयांच्या 70 किलो 250 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. 

कामठा येथे एका घरात गांजा लपवून ठेवला आहे व त्याची विक्री आरोप  करणार असल्याची गुप्त माहिती गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच सादर ठिकाणी धाड टाकली असता घराच्या मागच्या खोलीत ठेवलेल्या पोत्यामध्ये संबधित गांजा पोलिसांना आला.

या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून त्याने हा गांजा ओरिसा Orrisa राज्यातून गोंदियात आणल्याची कबूली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Edited By Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com