VIDEO | मुंबईत प्लास्टिकची अंडी

VIDEO | मुंबईत प्लास्टिकची अंडी

थंडीचा महिना असल्यानं मोठ्या प्रमाणावर अंड्याला मागणी आहे. पण जर तुम्ही जर अंडी खात असाल तर सावधान ! कारण मुंबईतल्या चारकोपमध्ये चक्क प्लास्टिकची अंडी सापडलीयेत. 

चारकोप भागातल्या दुकानातून एका व्यक्तीनं अंडी विकत घेतली. मात्र त्याला अंड्यांबाबत संशय आला. कारण ही अंडी प्लास्टिकची होती. या अंड्यावरून त्याच्यात आणि दुकानदारामध्ये बाचाबाची देखील आली. त्यानं स्थानिक नगरसेविकेकडे तक्रार केल्यानंतर या बनावट अंड्यांचा पर्दाफाश झाला.  याप्रकरणी पोलिसांनी 4000 अंड्यांसह दोन टेम्पो सील केले असून ही अंडी एफडीएच्या ताब्यात दिली आहेत. 

 हिवाळ्यात अंड्यांना मोठी मागणी असते. त्यामुळेच अंड्यांमध्ये अशी चायनीज अंडी मिक्स करून लोकांची फसवणूक केली जातीय. ही प्लास्टिकची अंडी  तुमच्या आमच्या जिवावर बेतू शकतात. या अंड्यापासून कॅन्सरसारखा आजारही होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अंडी खात असाल अशा बोगस अंड्यांपासून सावध राहा...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com