ताप, सर्दी, खोकल्याचा कहर

ताप, सर्दी, खोकल्याचा कहर

पुणे - अचानक बदललेल्या वातावरणामुळे शहरातील नागरिक तापाने फणफणले असून, सर्दी आणि खोकल्याने बेजार झाले आहेत. यामुळे लहान मुलेही बेजार झाली असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप सारडा म्हणाले, ""विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ताप आलेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पाऊस, ऊन आणि थंडी अशा झपाट्याने बदललेल्या वातावरणाचा हा परिणाम आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सहा ते सात दिवसांत रुग्ण यातून बरा होतो. पण, त्यासाठी तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे.''

ताप, सर्दी झालेल्या मुलांना शाळेत पाठवू नये. त्यातून शाळेतील इतर मुलांना संसर्ग होण्याची शक्‍यता असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अतुल बोराटे म्हणाले, ""लहान मुलांप्रमाणे मोठी माणसेही तापाने आजारी आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच डोकेदुखी आणि अंगदुखीच्या तक्रारी ते करीत आहेत. सध्या डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने वातावरणातील बदलांमुळे आलेला ताप आणि डेंगीचा ताप याचे अचूक निदान करण्याचे आव्हान आहे.''

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com