पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांची बियाणांच्या दुकानावर बियाणे घेण्याची लगबग सुरू
dhule

पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांची बियाणांच्या दुकानावर बियाणे घेण्याची लगबग सुरू

धुळे  : धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता शेतकऱ्यांची बियाणे पेरणीसाठीची लगबग सुरू झाली आहे. 
यासाठी कृषी केंद्रावर बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग बघावयास मिळत आहे.  After the first rain farmers almost start picking seeds at the seed shop

परंतु खतांचे वाढलेले भाव तसेच बियाणांचे वाढलेले भाव यामुळे  शेतकरी मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. एवढे करून देखील मौसम बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे एवढ्या मेहनतीने पेरलेले बी शेतकऱ्यांच्या हाती येईल की नाही याची देखील साशंका शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

हे देखील पहा -

असे असून देखील कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची बियाणे घेण्यासाठी गर्दी सुरू झाली आहे. पहिल्या पावसा पूर्वीच शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीची सर्व कामे आटोपली गेली होती. परंतु आता शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपल्यानंतर पहिला पाऊस पडून गेल्याने आता शेतकऱ्यांनी बियाणे पेरणीसाठी सुरुवात केल्याचे बघावयास मिळत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com