आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर
Asha volunteers and group promoter women employees

नंदुरबार - महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या कामांची व महिला बालकल्याण विभागाच्या योजनांचे ग्रामीण भागातील खेड्या - पाड्यात अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

तसेच कोरोनाचा संसर्ग आटोक्यात  आणण्यासाठी आणि सार्वत्रिक कोरोना लसीकरणाला गती देणाऱ्या जिल्ह्यातील 1800 आशा स्वयंसेविका व 180 गट प्रवर्तक महिला कर्मचारी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. 

ही देखील पहा - 

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत आशा सेविका महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसेच शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात असल्याचा संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

संघटनेच्यावतीने केलेल्या मागण्यां - 

- आरोग्य सेविका पदभरतीमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना 50 टक्के आरक्षण मिळावे.

-  सेविकांना योजनाबाह्य काम सांगू नये, मोबदल्याशिवाय त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेऊ नये.

-  प्रेरणा प्रकल्पाच्या रिपोर्टिंगसाठी दर सहामाई पंधराशे रुपये मोबदला देण्यात यावा.

- दरमहा मानधन जमा करतांना मोबदला हिशोब पावती देण्यात यावी, थकित मानधन त्वरित देण्यात यावे.

- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानधन दुप्पट करण्याचे आश्वासन पूर्ण करावे.

 या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संपावर जात असल्याचे  वैशाली खंदारे राज्य उपाध्यक्ष आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने सांगितले आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com