बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' समोर बंदोबस्त वाढवला

बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' समोर बंदोबस्त वाढवला
Bandobast At Sharad Pawar Residence in Baramati

बारामती : उजनीच्या Ujani Water पाण्यावरून सोलापूर Solapur जिल्ह्यातील शेतकरी Farmers हे आक्रमक होऊ लागले आहेत सोलापूर जिल्ह्यात अनेक आंदोलन झाल्यानंतर आज माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्या गोविंद बागेतील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिल्याने सकाळपासून या गोविंद बागेसमोर Govind Baug पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आलेला आहे त्याचबरोबर सकाळी दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Bandobast Increased at Sharad Pawar residence in Baramati

उजनीच्या पाणी प्रश्नावर आंदोलनासाठी गोविंदबागेसमोर निघालेल्या नागेश भारत वनकळसे (रा. मोहोळ, जि. सोलापूर) व महेश दामोदर पवार (रा. कोथाळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना आज तालुका पोलिसांनी Police माळेगावमध्ये ताब्यात घेतले. दरम्यान, गोविंदबागेसमोर आंदोलन होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी येथील सुरक्षा व्यवस्था वाढवली. गेल्या काही दिवसांपासून उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटला असून सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वाद पेटला आहे.

हे देखिल पहा

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूरला ५ टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय रद्द करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. परंतु, तसा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे. सोमवारी संघर्ष समितीतर्फे पंढरपूर-सातारा रस्त्यावर आंदोलन करण्यात आलं होतं. टायर जाळून रस्ता रोखण्याचाही प्रयत्न झाला होता. Bandobast Increased at Sharad Pawar residence in Baramati

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे मुळचे इंदापूरचे असल्याने त्यांनी उजनीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता, मात्र राष्ट्रवादीच्याच प्रदेशाध्यक्ष असलेल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला. राष्ट्रवादीत देखील या वरुन धुसफूस असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनीही इंदापूरला पाणी वळविण्यास विरोध केला आहे. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com