सावधान! गावात गर्दी कराल तर जाईल सरपंचपद!
Leader

सावधान! गावात गर्दी कराल तर जाईल सरपंचपद!

अकोला : अकोल्यात Akola कोरोना Corona  रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. शहराबरोबर ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गावात विना परवानगी जमाव किंवा परवानगीपेक्षा जास्त गर्दी Crowd झाल्याचे आढळून आल्यास संबंधित सरपंचांवर Sarpanch  अपात्रतेची कारवाई करण्यात येणार असून, तलाठी व ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. Be careful Post of Sarpanch Will be Ineligible If You Crowd in Village

यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय अधिकारी SDO डॉ.निलेश अपार यांनी अकोला तालुक्यातील सरपंचांसहतलाठी व ग्रामसेवकांना नोटीस Notice बजावल्या आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय. अनेक गावकऱ्यांना याचे गांभीर्य नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. गावागावात नागरिक विनाकारण गर्दी करतात या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते.

हे देखील पहा 

कुठल्याही नियमांचे पालन होताना दिसत नाही. गावात लग्न असल्यास या लग्नातही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परवानगी काढून ही लग्नात गर्दी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती जास्त आहे. गावातील विनाकारण गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासन वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना करत आहे. Be careful Post of Sarpanch Will be Ineligible If You Crowd in Village

अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी गावचे सरपंचसह, तलाठी, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी नोटीस बजावल्या आहेत. नोटीस मध्ये नमूद करण्यात आले आहे कि आपले अधिनस्थ संबंधीत गावामध्ये अंत्यविधी, लग्नसमारंभ इ. कार्यक्रम कुठलीही प्रशासनाची परवानगी न घेता आयोजीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

परवानगीच्या काही कार्यक्रमात मर्यादेपेक्षा जास्त नागरीक सहभागी होत असल्या कारणाने ग्रामीण भागामध्ये कोवीड चा प्रसार जास्त प्रमाणात होत असुन त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अंतर, मास्क न लावणे, सॅनिटायझरचा वापर न करणे या बाबी कारणीभुत ठरत आहेत. 

याबाबत संबंधीत गावाची सामाजिक व प्रशासनीक जबाबदारी उक्त आदेशान्वये आपणावर आहे, आपणाकडुन कार्यवाही होत नाही व याबाबत आपणाकडून कोणत्याही प्रकारची माहिती पोलीस विभाग व प्रशासनास सादर केली जात नसल्यामुळे कोवीड रुग्णांची संख्या वाढत आहे. ही अतिशय गंभीर स्वरुपाची बाब आहे. Be careful ! Post of Sarpanch Will be Ineligible If You Crowd in Village

नोटीस मध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे कि,  याव्दारे आपणास निर्देश देण्यात येत आहेत की, आपल्या अधिनस्थ गावामध्ये आयोजित कार्यक्रमास मर्यादेपेक्षा जास्त गर्दी होणार नाही तसेच पार पडत असलेल्या कार्यक्रमाची माहिती सबंधीत पोलीस स्टेशन यांना व प्रशासनास तात्काळ कळवावी. 

तसेच याची दक्षता घ्यावी सामाजिक अंतर, मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे या गोष्टींची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. सदर कामामध्ये दिरंगाई, हलगर्जीपणा आढळुन आल्यास सरपंच पद अपात्र करण्याची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल आणि तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांचेवर शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे नोटीस मध्ये म्हटले आहे. Be careful ! Post of Sarpanch Will be Ineligible If You Crowd in Village

या कारवाई मुळे ग्रामीण भागात कोरोना नियमांचे पालन होईल का हे पाहावे लागेल. पालन न केल्यास कारवाई होणे गरजेचे आहे.

Edited By - Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com