कोवॅक्सिन लस राज्यांना ६०० रुपयांत; नाकातून देण्याच्या लसीचेही संशोधन सुरु
Covaccine

कोवॅक्सिन लस राज्यांना ६०० रुपयांत; नाकातून देण्याच्या लसीचेही संशोधन सुरु

नवी दिल्ली : कोरोनाची कोवॅक्सिन Covaxine लस राज्य सरकारांना ६०० रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्याचे ही लस बनविणाऱ्या भारत बायोटेकने Bharat Biotech जाहीर केले आहे. हीच लस खासगी रुग्णालयांना १२०० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. कोवॅक्सिन कोरोनाचा डबल म्युटेंटही रोखू शकते असे 'आयसीएमआर' ने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर या लशीची मागणी वाढण्याची शक्यता आहे. 

कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. भारत बायोटेक Bharat Biotech जी लस उत्पादित करेल त्याच्या ५० टक्के साठा केंद्र सरकारसाठी Central Government राखीव असल्याचेही या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रती डोस १५ ते २० डाॅलर्स या किंमतीत ही लस अन्य देशांना निर्यात केली जाईल, असेही या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

कोरोनावरील नाकातून देण्यात येणाऱ्या लशीवर आम्ही संशोधन करत आहोत. त्यामुळे याचा खर्च भरून काढणे आवश्यक आहे. या लशीचा निर्मिती खर्चिक आहे. उत्पादन खर्च, उत्पादन केंद्र आणि वैद्यकीय चाचण्या यांचा खर्च यावरुन लशीची किंमत ठरविण्यात आल्याचे स्पष्टीकरण  भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एम. एल्ला यांनी दिले आहे.

दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ Covishield आता राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करता येणार आहे. ‘कोविशिल्ड’चे उत्पादन करणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने Serum Institure of India आपल्या लसीची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार, सर्व राज्यांच्या सरकारी रुग्णालयांसाठी ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये इतकी किंमत निश्चित केली आहे. Bharat Biotech Announces Price of its covaxin

सध्या देशात जी लसीकरण मोहिम सुरु आहे, ती केंद्र सरकारकडून नियंत्रित केली जात आहे. यासाठी लागणारे लसींचे डोसही केंद्र सरकारने ‘सिरम’कडून विकत घेतले आहेत. तसेच, ते इतर राज्यांना आणि खासगी लसीकरण केंद्रांना वितरित केले आहेत. मात्र, यापुढे आता राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना स्वतंत्ररीत्या हे डोस विकत घ्यावे लागणार आहे. त्याचबरोबर ‘सिरम’च्या उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के लस केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी तर उर्वरित ५० टक्के लस इतर राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना देणार आहे. Bharat Biotech Announces Price of its covaxin

‘सिरम’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘केंद्र सरकारच्या निर्देशांनंतर आम्ही कोविशिल्ड लसीच्या किमतीची घोषणा करत आहोत. त्यानुसार, राज्य सरकारांसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी किंमत निश्चित केली आहे. परदेशी लसींच्या तुलनेत कोविशिल्ड खूपच स्वस्त आहे.’’ सध्याच्या काळात लसींची तातडीची आवश्यकता आणि अनेक आव्हाने समोर असल्याने प्रत्येक कंपनीला वैयक्तिकरित्या लस उपलब्ध करून देणे शक्य नाही. त्यामुळे सर्व कॉर्पोरेट्स आणि खासगी कंपन्यांना राज्याच्या सुविधा व्यवस्थेकडून आणि खासगी आरोग्य यंत्रणांकडून लस उपलब्ध होऊ शकते. पुढील ४ ते ५ महिन्यांत लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असेही ‘सिरम’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com