न्याय मिळाला नाही तर अंबरनाथमधील भूमिपुत्रांचा आत्मदहनाचा इशारा

न्याय मिळाला नाही तर अंबरनाथमधील भूमिपुत्रांचा आत्मदहनाचा इशारा
Bhumiputra's warning of self-immolation in Ambernath if justice is not done

अंबरनाथ - अंबरनाथ Ambarnath तालुक्यातील चिखलोली गावातील शेतकऱ्यांच्या जागेवर Farmers' place एमआयडीसीने MIDC प्लॉटिंग काम plotting work सुरू केले आहे.  परंतु हे काम बाहेरील ठेकेदाराला देण्यात आले आहे.  त्यामुळे  शेतकरी Farmers वर्ग संतप्त झाले आहेत. आमच्या जागेवर आम्हालाच काम द्या अन्यथा आम्ही आत्मदहन करू असा इशारा एका पत्राद्वारे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. Bhumiputra's warning of self-immolation in Ambernath if justice is not done

अंबरनाथ तालुक्यातील चिखलोली गावातील 80 एकर जमीन सन 1961 साली एम आय डी सी ने कवडीमोल दराने विकत घेतली होती. चिखलोली गावातील शेतकऱ्यांच्या कित्येक पिढ्या इथे शेती करत होत्या. तसेच अजूनही करत आहेत. त्यांच्या मागच्या पिढीने या जमिनी एम आय डी सी ला  दिल्या आहेत. 

हे देखील पहा - 

परंतु आता शेती करत असलेले शेतकरीसुद्धा त्या जमिनी एम आय डी सी ला हस्तांतरित करण्यास तयार आहेत. मात्र यामध्ये जी विकासाची कामे होणार आहेत. त्यात चिखलोलीतील गावकऱ्यांना कामे मिळाली पाहिजे,भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांचा एम आय डी सी ने विचार करायला हवा अशी मागवी चिखलोली गावचे शेतकरी करीत आहेत. 

आमच्या जमिनीमध्ये होणाऱ्या प्लॉटीगमध्ये आधी भूमिपुत्रांचा विचार व्हायला हवा. भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील किमान एका सदस्याला सरकारी नौकरी देण्यात यावी. तसेच प्रत्येक भूमिहीन शेतकऱ्यांला प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्यात यावा.

या जमिनीवर होणाऱ्या प्रत्येक कामात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अश्या मागण्या शेतकऱ्यांनी एम आय डी सी कडे केल्या आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Edited by - Puja Bonkile 

Related Stories

No stories found.