पालघरमध्ये  हाॅस्पीटलच्या मॅनेजरला भाजप पदाधिकाऱ्याची मारहाण?

पालघरमध्ये  हाॅस्पीटलच्या मॅनेजरला भाजप पदाधिकाऱ्याची मारहाण?
Tunga Covid Centre

पालघर - बोईसर मधील तुंगा कोव्हीड सेंटर मधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.  भाजप पदाधिकाऱ्याने हॉस्पिटलच्या मॅनेजर ला मारहाण केल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी तुंगा रुग्णालयातील सर्व कर्मचारी बोईसर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.BJP office Bearer man handled hospital Staff in Palghar

भाजप पदाधिकारी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून कडक करावाई करावी, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी यावेळी केली.  भाजप चे पालघर जिल्हा पदाधिकारी प्रशांत संखे यांनी हाॅस्पीटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बिल जास्त दिल्याच्या रागाने मॅनेजर ला मारहाण केल्याची माहिती कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी दिली.  या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. सध्या तुंगा कोविड सेंटर मध्ये ३४ कोविड रुग्ण असल्याची प्राथमिक माहिती आहे.

दरम्यान, कोरोनाचे नियम पायदळी तुडवत विवाह समारंभ आयोजित केल्याबद्दल पालघरमधील रिसाॅर्ट मालकासह पोलिसांनी वधू पिता, केटर यांच्या विरोधात गुन्हा नोंवला आहे. केळवे येथील कोकोनट व्हॅली रिसाॅर्टमध्ये हा लग्न सोहोळा सुरु होता. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com