अनोखी लढाई : चंद्रपूर जिल्ह्यातील बोडधा गाव आहे सध्या कोरोनामुक्त

अनोखी लढाई : चंद्रपूर जिल्ह्यातील बोडधा गाव आहे सध्या कोरोनामुक्त
No Entry in Village

चंद्रपूर : जिल्ह्यातील गावाची कोरोना संसर्ग विरोधात अनोखी लढाई सुरू केली आहे. या गावाने आपल्या गावाच्या भोवताल काटेरी कुंपण केले आहे. जिल्ह्यातील चिमूर Chimur तालुक्यातील बोडधा Boddha गावाने ही गावबंदी केली आहे. हे गाव सध्या कोरोनामुक्त आहे. या गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला जबर दंड केला जात आहे. Boddha village in Chandrapur district is currently corona free

गावातही विनामास्क Mask फिरणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई केली जात आहे. बोडधा गावाच्या या कृतीची सर्व पंचक्रोशीत चर्चा चालू आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या टप्याने हाहाकार माजला असून, महाराष्ट्र होरपळून निघत आहे. महाराष्ट्रात Maharashtra covid-19 रुग्णांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. आरोग्य व्यवस्थेची दाणादाण होताना दिसत आहे.

महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊन Lockdown केले आहे, तसे या ग्रामपंचायतीनेही काही कडक पावले उचलली आहेत. अशाच काही गावांमध्ये अजूनपर्यंत कोरोनाचा Corona शिरकाव झालेला नाही किंवा ज्या गावांमध्ये रुग्ण आढळले नाही. त्या गावात गावकऱ्यांनी स्वतःच गावाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे. या ग्रामपंचायतीत ९ सदस्य असून लोकसंख्या २ हजाराच्या आसपास आहे. Boddha village in Chandrapur district is currently corona free

गावामध्ये गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच झाडाचे काटेरी कुंपण तयार करण्यात आले असून, या गावामध्ये कोणत्याही बाहेर गावच्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत आहे. कारण त्या व्यक्तीपासून कोरोनाचा शिरकाव होईल, यामुळे गावामध्ये बाहेर गावाच्या व्यक्तींना सध्या प्रवेश दिला जात नाही.

Edited By- Digambar Jadhav 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com