अख्खी कोंबडी गिळण्याचा नागाचा प्रयत्न फसला ! सर्पमित्रांकडून नागाला जीवदान

अख्खी कोंबडी गिळण्याचा नागाचा प्रयत्न फसला ! सर्पमित्रांकडून नागाला जीवदान
snake hen

सोलापूर : लहान तोंडी मोठा घास अशी आपल्याकडे एक म्हण आहे. मात्र हि म्हण फक्त माणसांसाठीच लागू ठरत नसून कधीकधी प्राण्यांसाठी पण लागू ठरते. याचाच प्रत्यय सोलापूरमधील खेड पाटी या ठिकाणी आला आहे. Cobra attempts To Swallow The whole Hen failed 

सोलापुरातील Solapur खेड पाटी येथील सोमनाथ तांदळे यांचे मोठे पोल्ट्रीफार्म Poultry Farm आहे. याठिकाणी बऱ्याच संख्येने कोंबड्या Hens आहेत. याचीच माहिती एका नागाला Cobra मिळाली शिकारीसाठी नागोबा पोल्ट्रीफार्ममध्ये आला.

चार फूट लांबीचा हा नाग येथे येऊन एक अख्खी बॉयलर कोंबडी गिळण्याचा Swallow प्रयत्न करत होता, मात्र, भक्ष मोठे असल्याने नागाला कोंबडी गिळण्यास अडचणी येत होती. त्यामुळे आवाका पाहून विषारी नागाने तोंडातून कोंबडी पुन्हा बाहेर काढुन निसटण्याचा प्रयत्न केला. 

हे देखील पहा -

मात्र या अख्ख्या बॉयलर कोंबडीच वजन साधारण दीड किलो असल्याने गिळण्याची प्रयत्नात नागाच्या तोंडाला दुखापत देखील झाली. सदर प्रकारची माहिती सोमनाथ तांदळे यांनी परिसरातील सर्पमित्रांना दिली. सर्पमित्रांनी घटना स्थळी येऊन शेवटी पोल्ट्रीफार्म मधील चार फुटी विषारी नागाला सुखरूप नैसर्गिक आदिवासात सोडून जीवदान दिले. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com