वर्ध्यात कोविड केअर सेंटरमधून आरोपी पसार

वर्ध्यात कोविड केअर सेंटरमधून आरोपी पसार
Corona Accused Ran Away from Covid Centre in Wardha

वर्धा : राज्यभरात कोरोनाचा Corona प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहे. त्यात काही नागरिक मात्र अजूनही गंभीर नसल्याचं चित्र आहे. यात वर्धा मध्ये तर एक अजब घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या Wardha सेवाग्राम रुग्णालयाच्या Sevagram Hospital कोविड Covid केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेला कोरोना पॉझिटीव्ह Positive आरोपीच चक्क पसार झाला आहे. Corona Positive Accused in Theft Case Ran Away from Wardha

आरोपीस हिंगणघाट Hinganghat येथील एका चोरीच्या प्रकरणामुळे अटक करण्यात आली होती. हा आरोपी आंध्रप्रदेश Andhra Pradesh मधील आहे असे पोलिसांकडून Police सांगण्यात आले आहे. या आरोपीचा Accused कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला सेवाग्राम रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

उपचार घेत असतानाच आरोपी रुग्णालयातून पळून गेला आहे. या घटनेमुळं पोलीसांची आरोपीला शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान तो पसार झाला असल्याने त्याचा शोध सध्या सेवाग्राम पोलीस घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com