गरोदर मातेला कोरोनाची लागण; देवदुत बनून डॉक्टरांनी केली प्रसुती
Corona Positive women Delivery Successful in Rajgurunagar

गरोदर मातेला कोरोनाची लागण; देवदुत बनून डॉक्टरांनी केली प्रसुती

राजगुरुनगर : कोरोना पाॅझिटिव्ह Corona Positive असलेल्या महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्यानंतर तिला हलवायचे कुठे हा प्रश्न डाॅक्टरांसमोर Doctor पडला. पण प्रसुतीसाठी विलंब होऊ नये म्हणून वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डाॅक्टर व स्टाफने केंद्रातच या महिलेची प्रसुती यशस्वीपणे पार पाडली. Corona Positive Pregnant women delivery successful in Khed

राजगुरुनगर Rajgurunagar खेड तालुक्यातील डोंगराळ भागातील वाडा येथील आज दुपारच्या सुमारास वैशाली शिवाजी वाडेकर वय २४ या गरोदर महिलेच्या अचानक पोटात दुखायला लागल्याने तात्काळ वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात Health Centre दाखल करण्यात आले.  दरम्यान गरोदर महिलेला मागील तीन दिवसांपासुन खोकला व सर्दी असल्याने डॉक्टरांनी कोविड अँन्टीजेन टेस्ट Antigen Test केली असता गरोदर महिला पॉझिटिव्ह असल्याचे प्रकार समोर आला.

मात्र प्रस्तुतीसाठी विलंब झाल्यास गरोदर माता व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होईल यामुळे वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुती यशस्वी पार पडली.  बाळ व माता दोघेही सुखरुप असुन दोघांनाही प्रसुतीनंतर पुण्यातील ससुन रुग्णालयात Sasoon Hospital पाठविण्यात आले आहे 

या महिलेची नैसर्गिक प्रसुती Natural Delivery झाली. या महिलेने बालकास जन्म दिला असून जन्माच्यावेळी त्याचे वजन २ किलो ८०० ग्रॅम भरले आहे. पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती करण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांपुढे होते. मात्र, महिलेची नैसर्गिक प्रसुती होऊन तीने एका नवजात बालकाला जन्म दिला. बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम आहे. एकीकडे कोरोनाचे युद्ध लढणाऱ्या डॉक्टरांनी या नव्या जीवाचाही मार्ग सुकर करुन दिला. यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेला एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. Corona Positive Pregnant women delivery successful in Khed

कोरोना महामारीच्या संकट काळात खेड तालुक्यातील वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ निखील अडमोल, उर्मिला दगडे,सुमन झुंझुरटे, अर्चना तांबे,प्रकाश पाटील या टिमने गरोदर महिलेची यशस्वी प्रस्तुती केली आहे.

Edired By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com