इटलीत कोरोनाचा हाहाकार  

इटलीत कोरोनाचा हाहाकार  

रोम: इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत इटलीत ६२७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तब्बल ५९८६ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे.  जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. 
मागील २४ तासांत इटलीमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे.  करोनाच्या संसर्गामुळे उपचार सुरू असलेल्या ५१२९ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र, इटलीत रुग्ण आणि मृत्यूंचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. इटलीत करोनाच्या संसर्गामुळे मृतांच्या संख्येत वाढ आहे. एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू शुक्रवारी नोंदवण्यात आले.कोरोनाच्या संसर्गामुळे इटलीतील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे.  

चीनमध्ये करोनावर नियंत्रण मिळवले असल्याचे सध्या चित्र आहे. चीनमध्ये नवीन करोनाबाधित रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे.करोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन व इटलीमध्ये करोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू हे वृद्धांचे झाले असल्याची चर्चा आहे. वृद्ध नागरिकांमध्ये आधीपासूनच कोणता तरी आजार असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. 

 
webTittle :: The coronation of Corona in Italy


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com