कृष्णा नदीच्या काठी अजस्त्र मगरीचे दर्शन

कृष्णा नदीच्या काठी अजस्त्र मगरीचे दर्शन
Crocodiles

सांगली - सांगलीत कृष्णा नदीच्या काठी अजस्त्र मगरीचे आज दर्शन झाले आहे. सकाळच्या सुमारास सांगलीतल्या नवीन पुलाजवळ अजस्त्र १३ फूट मगरीचे दर्शन झाले आहे. Crocodiles were found on the banks of the river Krishna

ही देखील पहा - 

कृष्णा नदी शेजारी ही मगर पोहताना आणि बसलेली दिसली आहे. काही वेळाने ती पुन्हा कृष्णा नदी पात्रात गेली. भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने या परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. 

सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात मगरीचे वास्तव आहे. अनेक वेळा कृष्णा नदी पात्रात मगरीचे दर्शन घडत असते. आज सकाळी ही भली मोठी मगर निदर्शनास आली आहे. 

यावेळी नदीमध्ये पोहण्यासाठी आलेले आणि नदी काठच्या नागरिकांनी या मगरीला पाहिले आहे. बराच वेळ ही मगर नदी काठी बसली होती. नंतर ती पोहत पोहत तिथून निघून गेली. 
 

Edited By - Puja Bonkile 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com