विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने बैल जोडीचा मृत्यू

 विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने बैल जोडीचा मृत्यू
Death of a pair of oxen due to contact with electric wires

यवतमाळ -  शेतकरी Farmers आणि वृषभ राजा हा आपल्या अर्थव्यवस्थेचा economy तसेच कृषि अर्थव्यवस्थेचा agricultural economy कणा आहे. शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की त्याचे आपल्या मुलाबाळांवर , आपल्या कुटुंबावर जितके प्रेम असते तितकेच प्रेम शेतीत राबणाऱ्या वृषभ राजावर असते . Death of a pair of oxen due to contact with electric wires

म्हणूनच शेतकरी आणि वृषभ राजामध्ये अतूट आणि एक भावनिक नातं असते. यवतमाळ जिल्ह्यातील झाडगाव येथे जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने बैल जोडीचा मृत्यू झाला.  

हे देखील पहा - 

ही दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. वादळी वाऱ्याने मौजा झाडगाव येथे वासुदेव पाल यांच्या शेतात विजेच्या तारांवर झाड पडल्याने तारा खाली तुटून पडल्या . बैल जोडीला  चराई करण्याकरिता सोडले होते . तेव्हा या बैल जोडीला जिवंत विद्युत तारांचा स्पर्श झाला.

त्यामुळे जागीच या बैल जोडीचा मृत्यू झाला. वयस्कर असलेल्या या बैलजोडीची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे. आपला जीव की प्राण असलेल्या या बैल जोडीच्या मृत्यूने पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Edited By - Puja Bonkile 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com