राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करा; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र !

 राज्यातील पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर घोषित करा; धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र !
DM

बीड : राज्यातील सर्व  वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी , कॅमेरामन, पत्रकार यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स Frontline Workers घोषित करावे. आणि त्यांना लसीकरणात Vaccination प्राधान्य देण्यात यावे. अशी मागणी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांनी, मुख्यमंत्री CM उद्धव ठाकरे Uddhav Thackrey यांना पत्र पाठवून केली होती. त्या पाठोपा आता राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री असलेले  धनंजय मुंडे यांनीही अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. Declare State journalists in the front line workers Dhananjay Munde letter to Uddhav Thackeray

हे देखील पहा - 

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील सर्व पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना Corona महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून वार्तांकनाचे आणि समाजात जनजागृतीचे काम करत आहेत.

या सर्व माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन, त्यांचे प्राधान्याने लसीकरण Vaccination करावे. अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे, आतातरी मुख्यमंत्री ठाकरे पत्रकारांबाबत निर्णय घेतील का ? याकडं सर्वांचं लक्ष लागल आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com