कायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरु आहे- विश्वजित कदम 

कायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरु आहे- विश्वजित कदम 
vishwajit kadam

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे ही आघाडी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत. आणि भविष्यातीही टाकली जातील. कायद्याने आरक्षण कसे, घेता येईल याची चर्चा सुरू आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Raje ) आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर आहे. पण आंदोलन हा वेगळा विषय आहे. परंतु, सर्वानी राज्य सरकार सोबत चर्चा चालू ठेवून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.  ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.(Discussions are underway on how to get reservation by law- Vishwajit Kadam)

दरम्यान, खासदार संभाजी राजे यांनी मागण्या मान्य केल्या नाही तर १६ जूनपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर, उदयन राजे भोसले यांनीही त्याला पाठिंबा दर्शविला आहे. २८ तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजी राजेंनी ६ जून ही आंदोलनाची तारीख ठरवली होती.

हे देखील पाहा

परंतु, रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात टाळेबंदी लावल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी शिवप्रेमींना घरीच राज्याभिषेक सोहळा करण्याचे आवाहन केले होते. परंतु, संभाजी राजेंची भूमिका बदलली काय? अशे प्रश्न समोर येत असताना संभाजी राजेंनी १६ तारखरेला आंदोलन करणार असल्याचा सांगत चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.  

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com