परभणी शहरात अतिवृष्टीमुळे नागरी वस्तीत शिरले पाणी

परभणी शहरात अतिवृष्टीमुळे नागरी वस्तीत शिरले पाणी
Due to heavy rains in Parbhani city, water infiltrated into urban areas

परभणी - परभणी शहरात रविवारच्या मध्यरात्री अतिवृष्टी झाली आहे. पिंगळगड नाल्याला पूर आल्याने  प्रभाग क्रमांक 16 मध्ये अनेक घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे काम महसूल प्रशासनाने सुरू केले आहे. Due to heavy rains in Parbhani city, water infiltrated into urban areas

परभणी शहरात रविवार  मध्यरात्री जोरदार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.  या पावसामुळे शहरालगत वाहणारा पिंगळगड नाला हा भरून वाहू लागला. काही वेळातच या नाल्याला पूर आल्याने नाल्या लगत असलेल्या प्रभाग क्रमांक 16  मधील बाबर कॉलनी, मंत्री नगर, क्रांती नगर या कॉलनीत पाणी शिरले आहे. 

हे देखील पहा - 

हे पाणी नागरिकांच्या घरात देखील शिरल्याने अनेकांच्या साहित्याची नासधूस झाली आहे. तसेच रात्रभर नागरिकांना जागे राहावे लागले आहे. गंगाखेडरोड वरील पिंगळगड नाला पुलाचे काम रखडत सुरू आहे. परंतु हा पूर आल्यामुळे तात्काळ पुलाचे काम करून नुकसानग्रस्त रहिवाशांना मदत करावी या मागणीसाठी सकाळी या प्रभागातील नगरसेवक सुशील मानखेडकर, नागेश सोनपसारे यांनी  पिंगळगड नाला गंगाखेड रोडवर येत रास्ता रोको आंदोलन केले आहे. 

परभणीचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी धाव घेत आंदोलनकर्त्यांची निवेदन स्वीकारून कारवाईला सुरुवात केली आहे. अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक 16  मधील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी नगरसेवक सुशील मानखेडकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com